कऱ्हाडात बिनविरोधचा डंका

By admin | Published: December 23, 2014 10:30 PM2014-12-23T22:30:30+5:302014-12-23T23:42:15+5:30

पालिका समित्या : माने, वायदंडे, फल्ले, खराडे, रोहिले यांना संधी

Unstoppable dancer in Karhad | कऱ्हाडात बिनविरोधचा डंका

कऱ्हाडात बिनविरोधचा डंका

Next

कऱ्हाड : कऱ्हाड नगरपालिकेच्या स्थायी व विविध विषय समितीच्या सभापती व पदाधिकारी यांच्या निवडी मंगळवारी बिनविरोध करण्यात आल्या. पिठासन अधिकारी म्हणून प्रातांधिकारी किशोर पवार तर सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी काम पाहिले.
लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, जयवंत पाटील, बाळासाहेब यादव यांची स्थायी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
बांधकाम समितीच्या सभापतीपदी राजेंद्र माने यांची निवड झाली असून सदस्य म्हणून मोहसीन आंबेकरी, सुहास पवार, पूनम रसाळ, प्रमोदसिंंह कदम, विजय वाटेगावकर, अरुणा मोहनराव शिंंदे, स्मिता हुलवान यांची वर्णी लागली.
पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी शीतल वायदंडे यांची निवड झाली तर सदस्य म्हणून हणमंतराव पवार, लीना थोरवडे, महम्मद बागवान, प्रमोदसिंंह कदम, जयवंत पाटील, विक्रम पावस्कर, श्रीकांत मुळे यांची निवड झाली. आरोग्य समितीच्या सभापतीपदी शैलजा फल्ले, तर अरूणा अशोकराव जाधव यांची उपसभापतीपदी निवड झाली. सदस्य म्हणून महम्मद बागवान, सुभाषराव पाटील, पूनम रसाळ, संगीता शिंदे, सुरेखा पालकर यांची निवड झाली.
नियोजन समितीच्या सभापतीपदी मंदा खराडे यांची निवड झाली. सदस्य म्हणून ज्योती बेडेकर, संगीता शिंदे, अरूणा जाधव, मोहसीन आंबेकरी, सुहास पवार, अरुण शिंंदे, शारदाताई जाधव यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नुरबानु रोहिले यांची निवड झाली.
पूनम रसाळ, संगीता देसाई, उमा हिंंगमिरे, ज्योती बडेकर, स्मिता हुलवान, अरूणा जाधव, शारदाताई जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Unstoppable dancer in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.