जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटात गारांसह अवकाळी दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:36 PM2021-02-18T18:36:34+5:302021-02-18T18:37:53+5:30

Rain Satara- सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाचा दणका सुरू झाला आहे. काही ठिकाणी ऊस, गहू झोपला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. दरम्यान, ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात होत असणाऱ्या पाऊस आणि वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडला आहे.

Untimely collision with hail in thunderstorms in the district! | जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटात गारांसह अवकाळी दणका !

जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटात गारांसह अवकाळी दणका !

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ढगांच्या गडगडाटात गारांसह अवकाळी दणका ! पिकांचे नुकसान : ऊस अन् गहू झोपला; वीज पुरवठा खंडित

सातारा : जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाचा दणका सुरू झाला आहे. काही ठिकाणी ऊस, गहू झोपला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. दरम्यान, ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात होत असणाऱ्या पाऊस आणि वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडला आहे.

जिल्ह्यातील वातावरण मागील तीन दिवसांपासून बदलत चालले आहे. थंडीचे प्रमाणही कमी झाले असून, किमान तापमान १६ अंशाच्या पुढे गेले आहे. त्यातच जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्याचबरोबर काही भागात वाऱ्यासह पावसानेही सुरुवात केली. सातारा शहरात तर बुधवारी रात्री पावणे नऊनंतर साडेदहापर्यंत पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील वीज पुरवठाही खंडित झाला. नागरिकांना जवळपास अर्धा तास अंधाराचा सामना करावा लागला. रात्री साडेदहा नंतर टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरू झाला. सातारा शहराबरोबरच तालुक्‍यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शेती पिकासाठी नुकसानकारक ठरत आहे.

बुधवारी रात्री माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरत पाऊस झाला. सध्या ज्वारी, गहू, हरभरा ही पिके काढणीस आली आहेत. काढणीच्या काळात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. खटाव तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला. या तालुक्यात फळबागा असल्याने गारा पडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

फलटण तालुक्यातील आदर्की परिसराची गुरुवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्या गारा पडल्या. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तसेच आदर्की परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर, पिंपोडे, सोनके, रणदुल्लाबाद या परिसरातही गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चांगला पाऊस झाला. जवळपास एक तास पाऊस पडला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अवकाळी पावसाचा काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभऱ्याला फटका बसणार आहे.

कऱ्हाड तालक्यातील मलकापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गहू, ऊस, शाळू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील कापिल, जखिनवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात जोराच्या वाऱ्यामुळे वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाले आहेत. काही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

ऊसतोडीवर परिणाम होणार...

जिल्ह्यात बुधवारपासून कोठे ना कोठे पाऊस होत आहे. त्यातच सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. ऊसतोड वेगाने सुरू आहे. त्यातच अवकाळी पाऊस पडत असल्याने ऊसतोडीवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर ऊस वाहतुकीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. कारण, जमिनीत पाणी साचणे, रस्ता निसरडा होण्याने वाहन घेऊन जाणे अवघड होऊन बसणार आहे.

सातारा शहरात दुसऱ्या दिवशीही हजेरी...

सातारा शहरात बुधवारी रात्री पाऊस झाला. ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जवळपास अर्धा तास पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

Web Title: Untimely collision with hail in thunderstorms in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.