अवकाळी पावसाने सोयाबीन काढणी, मळणीत व्यत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:46 AM2021-09-24T04:46:02+5:302021-09-24T04:46:02+5:30
कोपर्डे हवेली : सध्या सोयाबीन काढणीचा कालावधी संपत असल्याने कऱ्हाड उत्तर पूर्व विभागात सोयाबीन काढणी चार दिवसांपासून सुरू होती; ...
कोपर्डे हवेली : सध्या सोयाबीन काढणीचा कालावधी संपत असल्याने कऱ्हाड उत्तर पूर्व विभागात सोयाबीन काढणी चार दिवसांपासून सुरू होती; पण गुरुवारी अचानक अलेल्या अवकाळी पावसाने सोयोबीन काढणी आणि मळणीत व्यत्यय आला आहे.
कधी जादा पाऊस, तर कधी अल्प पाऊस या निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रतिकूल हवामानात सोयोबीनचे पीक आणले आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या काढणीची मुदत संपली आहे. काही शेतकरी काढणी आणि मळणी करत असतानाच अचानक अवेळी पावसाने हजेरी लावल्याने गुरुवारी शिवारात शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
सध्या पावसाचे वातावरण असल्याने आणि सोयाबीन काढणीस आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेच आहेत. गेल्यावर्षी सोयाबीन पिकाला चांगला बाजारभाव होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक घेतले आहे. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत क्षेत्रात वाढ झाली आहे.
सोयाबीन काढून शाळू पिकाचे उत्पादन घेतले जाते. यातील काही क्षेत्र जिरायती असल्याने उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते. त्यासाठी सोयाबीन लवकर काढून शाळूचे पीक घेतले जाते. शाळू पिकाची पेरणी झाल्यास विहिरीचे पाणी पुरते अन्यथा पाणी पातळी कमी होऊन शाळू पीक वाळून जाते. सध्या सोयाबीन काढून शाळू पिकाला शेत तयार करण्यासाठी शेतकरी तयार असतानाच सोयाबीन काढणीस आणि मळणीस पावसाने व्यत्यय आणला आहे.
चौकट
सोयाबीनची काढणी करून लगेच मळणी करणारे शेतकरी आहेत; तर काही शेतकरी शेतात या पिकाची गंजी लावतात, त्यालाच ढेपन म्हटले जाते. आणि नंतर त्याची मळणी केली जाते.
फोटो २३कोपर्डे हवेली
कऱ्हाड उत्तर पूर्व विभागात सोयाबीन काढताना अचानक आलेल्या पावसामुळे ते झाकण्यात आले.