पानटपरी फोडून यूपीएसची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:02+5:302021-03-17T04:40:02+5:30

सातारा : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शेजारील कँटीनलगतची पानटपरी फोडून त्यातील यूपीएसची चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात ...

UPS stolen by breaking Pantpari | पानटपरी फोडून यूपीएसची चोरी

पानटपरी फोडून यूपीएसची चोरी

Next

सातारा : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शेजारील कँटीनलगतची पानटपरी फोडून त्यातील यूपीएसची चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मुजफ्फर सय्यद (वय ३३, रा. बुधवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्र्याची पानटपरी असून तिथे त्यांनी एका काळ्या रंगाच्या सॅकमध्ये विविध गाड्यांचे आरसी बुक, कोरे चेकबुक, कस्टमरचे ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि एक यूपीएस ठेवला होता. मात्र, कोणीतरी अज्ञात चोरट्याने पानटपरीचे कडीकुलूप तोडून ही काळी सॅक चोरून नेली. या प्रकरणी मुजफ्फर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक भिसे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: UPS stolen by breaking Pantpari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.