उंब्रजला ५० बेडचे कोरोना सेंटर तातडीने उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:31+5:302021-04-26T04:35:31+5:30
उंब्रज : येथे ५० बेडचे कोरोना सेंटर तातडीने सुरू करून रुग्णवाहिकाही उपलब्ध करावी, अशी मागणी येथील शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या ...
उंब्रज : येथे ५० बेडचे कोरोना सेंटर तातडीने सुरू करून रुग्णवाहिकाही उपलब्ध करावी, अशी मागणी येथील शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाने करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात उंब्रज हे मध्यवर्ती ठिकाण आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे पंचेचाळीस हजार आहे. तसेच परिसरात सुमारे ४० छोटी मोठी गावे आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे उंब्रज व परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात सर्वत्र व्हेंटिलेटर बेडची सुविधा कमी पडत आहे. उंब्रज याठिकाणी सुसज्ज असे ५० बेडचे कोरोना सेंटर
तयार झाल्यास कऱ्हाड व सातारा येथील हॉस्पिटलवरील ताण कमी होईल. उंब्रजसह परिसरातील स्थानिक
लोकांची गैरसोय दूर होईल. सध्या येथे एकच रुग्णवाहिका आहे. सध्याची गरज विचारात घेतल्यास आणखी एक अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करुन मिळावी, अशी मागणी शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके, उपाध्यक्ष शरद जाधव, खजिनदार रणजित कदम, सचिव महेश जाधव, सदस्य सचिन जाधव यांनी लेखी निवेदनाने केली आहे.