‘उरमोडी’चे वीजबिल ‘ग्रीन पॉवर’ने भरले

By admin | Published: February 10, 2016 12:08 AM2016-02-10T00:08:02+5:302016-02-10T01:09:24+5:30

पुसेसावळीत सर्वपक्षीय चर्चासत्र : कार्यक्रमात ५० लाखांचा धनादेश सुपूर्द

Urmodi's electricity bill is filled with 'Green Power' | ‘उरमोडी’चे वीजबिल ‘ग्रीन पॉवर’ने भरले

‘उरमोडी’चे वीजबिल ‘ग्रीन पॉवर’ने भरले

Next

पुसेसावळी : उरमोडी पाणीयोजना चालविण्यासाठी गोपूज, ता. खटाव येथील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याने ५० लाख रुपयांचा धनादेश अधीक्षक अभियंता विजय घोगरे व सहकाऱ्यांकडे सुपूर्द केला. पुसेसावळी येथे उरमोडी प्रकल्प लाभधारकांचा पाणी आवर्तन, पाणीपट्टी व सहविचार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, कारखान्याचे संस्थापक संग्रामसिंह देशमुख, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे, जितेंद्र पवार, धैर्यशील कदम, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, चंद्रकांत पाटील, बबन कदम, नंदकुमार गोडसे, विठ्ठल स्वामी, डॉ. विवेक देशमुख, भरत जाधव, प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर, मीनाज मुल्ला, कार्यकारी अभियंता दाभाडकर, तहसीलदार विवेक साळुंखे, विलास इंगळे, धनाजी पावशे, प्रकाश घार्गे, सरपंच भारती कांबळे, भाग्यश्री भाग्यवंत, अनिल माने, संतोष घार्गे आदी उपस्थित होते.
‘मानसिंग माळवे म्हणाले, वीजबिलाच्या प्रश्नाने योजना बंद होत्या. याबाबत ग्रीन पॉवर शुगर्सने पुढाकार घेऊन ही योजना चालविण्याचे पालकत्व घेतले व खऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. रणजितसिंह देशमुख, जितेंद्र पवार, सुरेंद्र गुदगे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांची भाषणे झाली. (वातार्हर)

पाण्याचे योग्य नियोजन करावे!
संग्रामसिंह देशमुख म्हणाले, उरमोडी योजना चालविण्यासाठी त्याच्या वीजबिलाचाच प्रश्न समोर येतो. या भागातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन या योजनेचे ग्रीन पॉवर शुगर्सने वीजबिल भरण्याची जबाबदारी उचलली आहे. कारखानदारीमुळे त्या भागाचे, तालुक्याचे नंदनवन होते. व्यापार, व्यवसाय, रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. व्यासपीठावरील सर्व राजकीय मंडळी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. त्यामुळे आपणा सर्वांना एका व्यासपीठावर आणून आज शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या काही अंशी सोडविता आल्याचे आपणास भाग्य लाभले आहे. आगामी काळात या भागातील सर्वच राजकीय मंडळींनी उरमोडी योजनेतून येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करावे.

Web Title: Urmodi's electricity bill is filled with 'Green Power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.