रहिमतपुरात आढळली युरुळाची अंडी पाण्यापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:21 AM2021-03-30T04:21:55+5:302021-03-30T04:21:55+5:30
रहिमतपूर : येथील लक्ष्मण माने यांच्या शेतामध्ये युरुळा या सापाची अंडी चक्क पाण्यापासून बऱ्याच अंतरावर शेतात अडगळीत आढळून आली ...
रहिमतपूर : येथील लक्ष्मण माने यांच्या शेतामध्ये युरुळा या सापाची अंडी चक्क पाण्यापासून बऱ्याच अंतरावर शेतात अडगळीत आढळून आली आहेत. वन्यजीव रक्षक आकाश राऊत, सोबत त्यांचे मित्र नीलेश गाडे यांनी वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना घटनास्थळाची माहिती दिली. साधारणपणे युरुळा हा साप पाण्यात वास्तव्यास असतो. त्याची अंडीदेखील त्याच ठिकाणी किंवा आसपास असणाऱ्या कपारीमध्ये घालत असतो; परंतु पाण्यापासून बऱ्याच दूर असलेल्या माने यांच्या शेतामध्ये युरुळा या सापाने अंडी घातल्याचे दिसून आले. आकाश राऊत यांनी दूरध्वनीवरून ज्येष्ठ वन्यजीव रक्षक राजेंद्र परदेशी (पुणे) यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवनाथ कोळेकर यांच्या साहाय्याने युरुळा सापास त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यात आले आहे.
२९रहिमतपूर-साप
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील शेतात युरुळा या सापासह त्याची अंडी सापडली आहेत. (छाया : जयदीप जाधव)