फलटणच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा सुगंधी शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:05 PM2018-08-26T23:05:26+5:302018-08-26T23:05:35+5:30

The use of Aromatic Farm of Phaltan Minority Farmer | फलटणच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा सुगंधी शेतीचा प्रयोग

फलटणच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा सुगंधी शेतीचा प्रयोग

Next

विकास शिंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, डाळिंब यासारख्या पिकांना किमान एकर-दीड एकर क्षेत्र आवश्यक असते; पण अल्पभूधारक असणाºया पवार यांनी पाच गुंठे क्षेत्रात मोगºयाचा सुगंध फुलवत आपल्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.
लहानपणापासून शेतीची आवड असणारे सुरेंद्र हे हार बनविण्याचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करत असतानाच मोगºयाच्या फुलांची शेती करण्याची कल्पना त्यांना सुचली. हार, गजरे तयार करताना मोगºयाच्या फुलांचा तुटवडा त्यांना जाणवू लागला. त्यातूनच त्यांनी त्यांच्याकडे असणाºया पाच गुंठे क्षेत्रात बारामती येथून आणलेली मोगºयाची रोपे लावली आणि गेल्या तीन वर्षांपासून अखंडपणे या प्रयोगातून त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण झाले.
सुरेंद्र यांच्या शेतात आज शंभर झाडे आहेत, त्याचे त्यांनी व्यवस्थित हंगामवार नियोजन केले आहे. मार्च ते सप्टेंबर या महिन्यांत महाराष्ट्रीयन एक पाकळी मोगरा त्यांनी लावला आहे तर सप्टेंबर ते मार्च यासाठी बेंगलोरचा कांगडा त्यांनी लावला आहे. कमी क्षेत्र असणाºया शेतकºयांसाठी फुलशेती निश्चितच फायद्याची ठरत आहे.
सुरेंद्र यांचे सर्वच कुटुंबीय सकाळी लवकर कळ्या तोडायला सुरुवात करतात. या कामात त्यांची पत्नी अश्विनी, आई सरस्वती, वडील दत्तात्रय व मुलगा धनराज त्यांना मदत करतात. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत सर्व फुलकळी तोडून नंतर फलटण येथील हार विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जातो.
मोगºयाला ग्रामीण भागात किलोला दोनशे ते अडीचशे रुपये हमखास मिळतात. लग्न तिथीच्या दिवशी तीनशे ते चारशेपर्यंत हा दर जातो. शहरात मोगºयाला किलोमागे पाचशे ते सहाशे रुपये दर मिळतो. त्यामुळे कमी क्षेत्र आहे म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. उलट क्षेत्र कमी असल्यामुळे आपण तिच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.
झाडांना समजून
घेणं आवश्यक..
प्रत्येक शेतकºयाने प्रयोगशील असले पाहिजे. शेतीत माती आणि पाणी हे एक प्रकारचे गणित आहे. झाडांना काय पाहिजे आणि काय नको, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण माणसांना, जनावरांना समजून घेतो तसेच झाडांना शेतीला घेतलं तर आपणास कधीच नुकसान होणार नाही, असे ही सुरेंद्र पवार सांगतात.

Web Title: The use of Aromatic Farm of Phaltan Minority Farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.