सुपिकता निर्देशांकानुसार खताचा वापर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:08+5:302021-03-06T04:37:08+5:30
कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची येथे शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच बापूराव सुतार यांच्याहस्ते ...
कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची येथे शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच बापूराव सुतार यांच्याहस्ते सुपिकता निर्देशांकाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कृषी सहायक बाळासाहेब माळी, मेहबूब शेख, आबासाहेब कुंभार, अस्लम मुल्ला, मंगला साळुंखे, सारिका सरगरे, वैभव नाळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कृषी मित्र मधुकर चव्हाण आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिक कार्यक्रमामधून वनवासमाची आणि जखीणवाडी या दोन गावांची निवड कऱ्हाड मंडलातून करण्यात आली आहे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीतील रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी व सुक्षमद्रव्ये यांच्या कमतरतेनुसार द्यावयाची खतांची मात्रा, याची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. जमीन व्यवस्थापनविषयी संशोधक डॉ. खांडेकर, तर ऊस व्यवस्थापन याविषयी सुनील ताकटे हे मार्गदर्शन करीत आहेत.
मंडल कृषी अधिकारी अशोक कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. कृषी पर्यवेक्षक विनोद पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. कृषी सहायक ज्योती शिंदे यांनी आभार मानले.
फोटो : ०५केआरडी०१
कॅप्शन : वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात सुनील ताकटे यांनी शेतकऱ्यांना ऊस व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.