आधुनिक शेतीसाठी मोबाइल वापरावा : साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:43 AM2021-09-21T04:43:26+5:302021-09-21T04:43:26+5:30
रामापूर : ‘आधुनिक शेतीसाठी मोबाइल ॲपचा वापर करावा, असे मत कृषीकन्या प्रेरणा साळुंखे हिने व्यक्त केले. यावेळी त्यांनी ॲप ...
रामापूर : ‘आधुनिक शेतीसाठी मोबाइल ॲपचा वापर करावा, असे मत कृषीकन्या प्रेरणा साळुंखे हिने व्यक्त केले. यावेळी त्यांनी ॲप कसे वापरावे याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.
पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील झाकडे गावची कन्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय दापोली येथे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कृषीकन्या प्रेरणा दीपक साळुंखे ग्रामीण उद्योजकता जागृत विकास योजनेंतर्गत पाटण येथील शेतकऱ्यांना एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन कसे करावे याची माहिती शेतकऱ्यांना देत आहे. यावेळी ती बोलत होती.
ती म्हणाली, ‘ग्रामीण भागातील शेतकरी हा पारंपरिक शेती करतोय; पण त्याला तंत्रज्ञान आणि शेती व्यवस्थापन याची साथ मिळाली तर शेती फायद्यात येऊ शकते. यासोबत शेती करताना येणाऱ्या अडचणीवर मात करता येऊ शकते. यासोबत एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करताना घ्यावयाची काळजी घेण्याची गरज आहे. रोग व कीड व्यवस्थापन हे शेतकरी व शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. यामध्ये कीड व रोगांच्या व्यवस्थापनाने संपूर्ण नियंत्रण घेता येते. ही पद्धत पर्यावरणस्नेही असून, खर्च कमी करणारी आहे. शेतकऱ्यांनाही यापुढे उन्नत व शाश्वत शेतीसाठी नियमित एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन वापर करून जास्तीत जास्त निसर्गाचे संवर्धन करून जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’