ऊस शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:45 AM2021-02-17T04:45:54+5:302021-02-17T04:45:54+5:30
कृष्णा सहकारी साखर कारखाना व शेती अवजारे निर्मिती करणारी नामांकित शक्तिमान कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती अवजारांच्या ...
कृष्णा सहकारी साखर कारखाना व शेती अवजारे निर्मिती करणारी नामांकित शक्तिमान कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती अवजारांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, गिरीश पाटील, सुजित मोरे, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहायक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, डॉ. विजय कुंभार आदी उपस्थित होते.
दिवसेंदिवस शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांची कमतरता जाणवत आहे. नांगरणीपासून ते ऊस तोडणीपर्यंत विविध यंत्रांचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. आधुनिक यंत्राची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, या उद्देशाने कारखान्याने शेती अवजारे प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. यावेळी रोटरी टिलर, रिव्हर्स फॉरवर्ड रोटरी टिलर, स्केवर बेलर आदी मशीनचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखवण्यात आली. शक्तिमानचे महेश सूळ, राजदीप पाटील, चेतन चौधरी, संग्राम बुचडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, डॉ. सुरेश भोसले यांनी कारखान्याच्या ऊस रोपवाटिकेला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
फोटो ओळी : रेठरे बुद्रुक (कराड) येथे कृष्णा कारखाना प्रक्षेत्रावर आधुनिक शेती अवजारांच्या प्रात्यक्षिकप्रसंगी डॉ. सुरेश भोसले, जगदीश जगताप, संचालक, अधिकारी व शेतकरी.
फोटो :16 pramod 01