दरोडेखोरांच्या हल्ल्यात सॅँडलचाही वापर..

By admin | Published: October 28, 2014 11:51 PM2014-10-28T23:51:56+5:302014-10-29T00:10:50+5:30

कुटुंब अजूनही दहशतीखाली : खटाव तालुक्यातील अंबवडे, नढवळ दरोडा प्रकरणाचा तपास सुरुच

The use of sandals in the attack of robbers. | दरोडेखोरांच्या हल्ल्यात सॅँडलचाही वापर..

दरोडेखोरांच्या हल्ल्यात सॅँडलचाही वापर..

Next

शेखर जाधव - वडूज -रविवारच्या मध्यरात्रीच्या घटनेने अंबवडे व नढवळ गावातील पवार व झेंडे कुटुंबावर दिवाळीतील भाऊबीजेनंतरची मध्यरात्री ही काळ रात्र ठरली असून आजही त्या कुटुंबाला त्या क्षणाची आठवण झाली तर त्यांच्या नजरा भेदरलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.
खटाव तालुक्यातील अंबवडे आणि नढवळ गावात रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांना धुमाकूळ घालत पिता व मुलीस जखमी करून सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. सदर घटनेचे सविस्तर वृत्ताची माहिती देताना अंबवडे येथील आटोळी वस्तीवर राहणाऱ्या सुभाष साहेबराव पवार यांनी सांगितले की, रविवार, दि. २६ रोजी दुपारी दोन वाजता अंबवडे येथील मित्रांकडून ट्रॅक्टरला पलटी घेण्यासाठी ४० हजार रुपये घेऊन यायचे व शेतीची उर्वरित कामे करायची म्हणून रात्री उशिरा ते आपल्या मुली माधुरी, अश्विनी, अनुराधा व पत्नीसह छोटेखानी घरात झोपले. मध्यरात्री १२.४५ वाजता घरात कोणतरी घुसले असल्याचे लक्षात येताच समोर पाहतोय तर पत्नीकडे गळ्यातील व कानातील एक अज्ञात इसम मागणी करत असल्याचे ऐकून सुभाष पवार यांच्यासह मुलींना जाग आली. मुलगी माधुरी (वय १५) ही ओरडू लागताच तिच्या चेहऱ्यावर सॅडल फेकून मारला. त्यामध्ये तिच्या उजव्या डोळ्याखाली जखम झाली. सुभाष पवार यांनी एका चोरट्याचा पाय धरून ठेवला असता त्या चोरट्याने पाय सोडवून घेण्यासाठी सलग दोन चाकूचे वार हातावर केले. तरीही पाय सोडत नसल्याचे पाहून त्या चोरट्यांनी तिसऱ्यांदा जोरवार वार केल्यानंतर तो वर हाताच्या हाडापर्यंंत पोहचल्यावर पवार जोर जोरात ओरडू लागले. हा आवाज ऐकताच रस्त्यापलीकडे वास्तव्यास असणारे दत्तू पाटील हे धावून आल्याचे पाहताच आत दोन आणि बाहेर दोन असणारे चोरटे पवार यांच्या शेतातून पळून गेल; परंतु पळून जाण्यापूर्वी कपाटातील ४० हजार व दोन मोबाईल, घड्याळ घेऊन गेले.
मुंबईला नोकरीसाठी वास्तव्यास असणारे श्रीकांत, सूर्यकांत व सचिन हे तीन बंधू गावी आले होते. त्यांचे आई-वडील भाऊबीजेसाठी मुंबईला गेले होते. नुकतेच मुंबईहून आल्याने श्रीकांत व सूर्यकांत यांनी आपल्या सुटकेस घरातील खाटेवरच ठेवल्या होत्या. दोघेही आपल्या पत्नी व मुलाबाळासह माजघरात झोपले होते तर सचिन हा सोप्यात झोपला होता. मध्यरात्री २.२० च्या दरम्यान मात्र घरात कोणीतरी आल्याची चाहूल श्रीकांत यांना लागली असता प्रारंभी त्यांना वाटले सचिनच आला आहे; परंतु समोर पाहतोय तर दोघेजण उभे त्यातील एकाने डोळ्यावर बॅटरी मारल्याने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसू शकले नाहीत. आरडा ओरडा झाल्याने ते पसार झाले. ते पांढऱ्या रंगाच्या ओमिनीमधून पळून गेले. जाताना त्यांनी मोबाईलच्या बॅटऱ्या काढून मोबाईल तेथेच टाकला. (प्रतिनिधी)
तिघी बहिणी व आईसोबत झोपले असताना कोणाच्यातरी आवाजाने मला जाग आली. पाहते तर समोर आईच्याकडे गळ्यातील व कानातील मागणी केल्यानंतर हे चोरटे असणार, त्यामुळे आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली, तर त्यातील एकाने मला सॅडल फेकून मारल्याने गालावर जोरात लागल्याने मी रक्तबंबाळ झाले. वडिलांच्यावरही चाकूने वार केल्याने घाबरलेल्या अवस्थेत आम्ही जोरात ओरडलो. हे पाहून चोरटे पसार झाले; परंतु त्या क्षणाची आजही आठवण आली तर खूप भीती वाटते.
-माधुरी पवार

Web Title: The use of sandals in the attack of robbers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.