ऊसतोड मजूर महिला अनाहुत सन्मानाने सुखावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:50+5:302021-03-10T04:38:50+5:30

वारुंजी (ता. कऱ्हाड) येथे अ‍ॅस्ट्रॉलॉजिस्ट वृषाली चव्हाण-पाटील यांच्या संकल्पनेतून ‘आऊसाहेब जिजाऊ संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कोडोलीचे पोलीसपाटील ...

Ustod laborers were dried with unconditional respect | ऊसतोड मजूर महिला अनाहुत सन्मानाने सुखावल्या

ऊसतोड मजूर महिला अनाहुत सन्मानाने सुखावल्या

Next

वारुंजी (ता. कऱ्हाड) येथे अ‍ॅस्ट्रॉलॉजिस्ट वृषाली चव्हाण-पाटील यांच्या संकल्पनेतून ‘आऊसाहेब जिजाऊ संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कोडोलीचे पोलीसपाटील सुधाकर जगताप, दिनेश चव्हाण उपस्थित होते.

ऊसतोड मजूर महिला दिवसभर घाम गाळून सायंकाळी थकल्या शरीराने आपल्या झोपडीवर परततात. त्यावेळी वाटेकडे डोळे लाऊन बसणारी मुले आईला पाहताच मनोमन सुखावतात. आईला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य तरळते आणि मुलांच्या चेहऱ्यावरचं हेच हास्य मजूर महिलांना लाखमोलाचं समाधान देतं. महिलादिनाच्या निमित्ताने मजूर महिलांना हेच समाधान मिळावे, यासाठी ‘आऊसाहेब जिजाऊ ग्रुप’कडून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. वृषाली चव्हाण-पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वारुंजीतील गुऱ्हाळगृहावर काम करणाऱ्या मजूर महिलांना एकत्रित करून त्यांच्यासह मुलांना यावेळी ग्रुपकडून भेटवस्तू देण्यात आल्या. कपडे, मिठाई यासह धान्याचेही वाटप करण्यात आले. तसेच महिलांच्या कष्टाचा, त्यांच्या सहनशिलतेचा यावेळी सन्मान करण्यात आला.

सामाजिक बांधिलकी जपताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी वृषाली चव्हाण-पाटील यांनी सांगितले. शरू बेनकर यांनीही यावेळी मजूर महिलांशी संवाद साधला.

- चौकट

मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

आऊसाहेब जिजाऊ संस्थेच्यावतीने यावेळी वृषाली चव्हाण यांनी मजूर महिलांशी संवाद साधला. त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींची माहिती घेण्यात आली. त्यावेळी अनेक महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी चिंता व्यक्त केली. शिक्षण नसल्यामुळे आमच्यावर मजुरीची वेळ आली; पण आमच्या मुलांवर ही वेळ येऊ नये, अशी भावना यावेळी मजूर महिलांनी व्यक्त केली. त्यावेळी संबंधित मुलांना आवश्यक ती शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासन संस्थेच्यावतीने देण्यात आले.

फोटो : ०९केआरडी०४

कॅप्शन : वारुंजी (ता. कऱ्हाड) येथे आऊसाहेब जिजाऊ संस्थेच्यावतीने ऊसतोड मजूर महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वृषाली चव्हाण-पाटील, शरू बेनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Ustod laborers were dried with unconditional respect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.