उत्तरमांड धरण, डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:08 PM2022-07-19T16:08:38+5:302022-07-19T16:09:10+5:30

धरणाच्या सांडव्यावरुन २५९० घ.फु.प्र.से. पाणी वाहू लागले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला

Uttarmand dam, Derwan Pazar lake in Patan taluka filled to capacity | उत्तरमांड धरण, डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

उत्तरमांड धरण, डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

googlenewsNext

हणमंत यादव

चाफळ: कराड - पाटण  तालुक्याला  वरदान ठरलेले चाफळ विभागातील गमेवाडी येथील उत्तरमांड धरण व वाघजाईवाडी येथील डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरुन सांडव्याव्दारे पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.

गत पंधरा दिवसापासुन धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या धुवाधार पावसामुळे पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. काल, सोमवारी सायंकाळी धरणाच्या सांडव्यावरुन २५९० घ.फु.प्र.से. पाणी वाहू लागले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गमेवाडी येथे उत्तरमांड धरण असून नाणेगांव ब्रुद्रुक गावच्या सरहद्दिवर उत्तरमांड नदिवर हा प्रकल्प साकारला आहे. संपुर्ण चाफळ विभागासह कराड तालुक्यातील खालकरवाडी, चरेगांव, भवानवाडी, उंब्रज परिसरातील वाड्या वस्त्यांना या धरणाचे पाणी मिळते. सध्या उत्तरमांड मध्यम प्रकल्पात 693.70 टीएमसी पाणीसाठा आहे.

प्रकल्पाचे काम पूर्ण पण विस्थापितांचे प्रश्न प्रलंबित

एक हजार ४२० मीटर लांब व ४४.४५ मीटर उंच असलेल्या जलाशयात ६८३ मीटर जलसंचय पातळी आहे. या प्रकल्पात तब्बल ६२५ एकर जमीन बाधित झाल्याने नाणेगांव , माथणेवाडी ग्रामस्थांना विस्थापित व्हावे लागले आहे. धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या पिचींगसह सांडव्यातील पंधरा मीटर उंचीच्या भिंतीचे काम पुर्ण केले आहे. पुराचे पाणी सोडण्यासाठी दगडी बांधकामाच्या सांडव्यावर १२×४ मीटर आकाराचे तीन वक्र दरवाजे बसवले आहेत. परंतु माथणेवाडीकरांचे पुनर्वसन रखडल्याने धरणात एक टीएमसी पाणीसाठा करण्यास  प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी आजही विस्थापितांचे प्रश्न प्रलंबित आहेत.

डेरवण पाझर तलावही ओव्हर फ्लो

वाघजाईवाडी जवळ असणारा डेरवण पाझर तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. याही तलावाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग होत आहे. गत वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तलाव ओव्हर फ्लो झाला होता. या तलावाचे पाणी वाघजाईवाडी, डेरवण, गमेवाडी, बोर्गेवाडी, शिंगणवाडी, चाफळ, माजगांव आदी गावातील शेतजमिनींना मिळते. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Uttarmand dam, Derwan Pazar lake in Patan taluka filled to capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.