वाठारस्टेशनला लक्षवेधी; देऊर बिनविरोध होणार?

By admin | Published: February 10, 2015 10:29 PM2015-02-10T22:29:51+5:302015-02-10T23:55:01+5:30

निवडणूक : कोरेगावच्या उत्तर भागात ग्रामपंचायतींची मोर्चेबांधणी

Vaastarastaa attention; Will Dewar be unconstitutional? | वाठारस्टेशनला लक्षवेधी; देऊर बिनविरोध होणार?

वाठारस्टेशनला लक्षवेधी; देऊर बिनविरोध होणार?

Next

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या वाठार स्टेशन, देऊर, तळिये, तडवळे (सं) वाघोली या गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकींची राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी सहा महिन्यांत या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगतदार होणार आहेत. दरम्यान, वाठार स्टेशनची निवडणूक लक्षवेधी ठरणार तर देऊरची बिनविरोध होणार? याकडे लक्ष लागले आहे.वाठारस्टेशन ग्रामपंचायतीत मागील पंचवार्षिक निवडणूक तिरंगी झाली होती. त्यावेळी सरपंच अमोल आवळे यांनी प्रथमच परिवर्तन घडवत परिवर्तनचे आठ सदस्य निवडून आणले होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अंकुश जाधव, राष्ट्रवादीचे नागेश जाधव यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढवली होती. पाच वर्षांतील वाठार ग्रामपंचायतीचा लेखाजोखा आता येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत वाठार स्टेशन मध्ये एक उमेदवार ज्यादा मिळाला असल्याने नऊ सदस्य स्टेशन मधून तर चार सदस्य वाठार गावातून निवडणूक लढविणार आहेत.कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रूपाली जाधव, नागेश जाधव यांच्यासाठी ही निवडणुका प्रतिष्ठेची राहणार आहे. वाठार स्टेशन व वाठार गावात नेहमीच निर्णायक भूमिका घेणारे माजी पंचायत समिती सदस्य अंकुश जाधव हे स्वतंत्र पॅनेल टाकरणार की, नागेश जाधव यांच्याबरोबर राहणार याची उत्सुकता वाठारकरांना आहे. तर विद्यमान सरपंच अमोल आवळे महायुतीच्या संपर्कात असून, परिवर्तन व महायुती एकत्रितपणे या निवडणुका लढण्याची चर्चा आहे. यामुळे गत पंचवार्षिक प्रमाणेच या वेळेही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. (वार्ताहर)

शशिकांत शिंदेंची अग्निपरीक्षा
देऊर ग्रामपंचायत ही विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. हे गाव आमदार शशिकांत शिंदे यांनी दत्तक घेतले आहे. शिंदे देऊर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात यशस्वी होणार का? हा मुख्य प्रश्न आहे. ३५ वर्षांनंतर देऊर ग्रामपंचायत ताब्यात घेतलेल्या जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांना यावेळी त्यांच्याच गटातील अंतर्गत कुरघोड्यांना सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादी अंतर्गत गावान तिन्ही गट असल्याने हे गट एकत्रित आणण्यास आमदार शशिकांत शिंदे कितपत यशस्वी होणार, याकडे परिसराचे लक्ष आहे.

Web Title: Vaastarastaa attention; Will Dewar be unconstitutional?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.