पत्रकारांना लस द्या.. अन्यथा आंदोलन छेडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:37 AM2021-05-16T04:37:46+5:302021-05-16T04:37:46+5:30

फलटण : सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना तातडीने लस उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपने एका निवेदनाद्वारे ...

Vaccinate journalists .. otherwise start agitation | पत्रकारांना लस द्या.. अन्यथा आंदोलन छेडू

पत्रकारांना लस द्या.. अन्यथा आंदोलन छेडू

googlenewsNext

फलटण : सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना तातडीने लस उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपने एका निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे. सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना लस उपलब्ध करून द्यावी, यासाठी तहसीलदार समीर यादव यांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, भटक्या आणि विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, राहुल शहा यांच्या उपस्थितीत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर रोगामुळे या राज्यातील लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत. हजारो रुग्ण मृत पावले आहेत. राज्य शासनाने डॉक्टर्स, पोलीस, यंत्रणा शासकीय कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दिलेला आहे. यामध्ये खरंतर पत्रकारांना हा दर्जा द्यायला पाहिजे होता. सातारा जिल्ह्यामध्ये साधारणत: ११०० ते १२०० पत्रकार व इतर कर्मचारी असतील. शासन त्यांना दर्जा देण्याच्या बाबतीत उदासीन दिसत आहे. पत्रकार हे खरंतर प्रशासनासोबत काम करत असतात. संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ते रात्रंदिवस काम करत आहेत. मंत्र्यांचे दौरे असोत, पत्रकार परिषद कोविड सेंटरची उद्घाटने, लसीकरण याबाबत जनजागृती करण्याचे काम सातत्याने करत असतात गोरगरीब, दीनदुबळ्या जनतेच्या व्यथा, तसेच शासनाचे चांगले काम दाखवण्याचा ते काम करत असतात. कसलीही तमा न बाळगता लोकांसाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. हे काम करत असताना राज्यातील अनेक पत्रकार बांधवांचे जीव या कोरोनामुळे गेले आहेत, अजून किती पत्रकारांचे जीव गेल्यानंतर शासनाला जाग येणार आहे. खरंतर पत्रकारांना शासनाने त्यांच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठीसुद्धा मदत केली पाहिजे. शासन तेही करत नाहीत निदान साधी त्यांना लस उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या आरोग्याची दृष्टीने मदत होईल, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Vaccinate journalists .. otherwise start agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.