खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा : साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:14+5:302021-05-14T04:38:14+5:30
सातारा : कोरोनाकाळात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून काम करत असलेल्या सर्व खासगी शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्वरित करण्यात यावे, ...
सातारा : कोरोनाकाळात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून काम करत असलेल्या सर्व खासगी
शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण त्वरित करण्यात यावे, अशी
मागणी खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष
अजित साळुंखे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना
दिलेल्या निवेदनात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्व शिक्षक
शासनाने दिलेल्या आदेशानुसार कार्यरत आहेत. कर्तव्य बजावताना त्यांचा अनेक
लोकांशी संपर्क येत आहे. त्यामुळे एखादा बाधित कर्मचारी अनेकांना बाधित
करण्याची शक्यता या काळात नाकारता येत नाही. गेल्या वर्षीपासूनच हे सर्वजण
फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून काम करत आहेत. मात्र, या शिक्षकांचे अद्याप लसीकरण
झालेले नाही. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता तसे आदेश नाहीत, असे
शिक्षकांना सांगण्यात येत आहे, तर सर्व जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे लसीकरण त्वरित करण्यात यावे, अशी मागणी
करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे, उपाध्यक्ष
दीपक पवार, रूपेश शिंदे, सचिव लालासाहेब दडस, संदीप मस्के, कार्यकारिणी सदस्य
कैलास मगर, अजित कणसे, सारंग कुलकर्णी, सूरज ननावरे, शरद फडतरे, रणजित
भोईटे, जयश्री उबाळे, मनीषा मोरे, नूतन रणबागले तसेच राज्य सदस्य सुनील बुधावले उपस्थित होते. (वा.प्र.)