देगाव येथे २५९ नागरिकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:40+5:302021-04-13T04:37:40+5:30
वाई : वाई तालुक्यातील देगाव येथे कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याचा फायदा देगावसह परिसरातील गावांमधील नागरिकांना होत आहे. ...
वाई : वाई तालुक्यातील देगाव येथे कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याचा फायदा देगावसह परिसरातील गावांमधील नागरिकांना होत आहे. आतापर्यंत २५९ जणांना लस देण्यात आली आहे.
भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत देगाव उपकेंद्राच्यावतीने कोरोना लसीकरण सुरू आहे. देगाव येथील शाळेत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ४५ वर्षांवरील २५९ ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.
उपसरपंच प्रकाश इथापे यांच्याहस्ते सुरुवात झाली. यावेळी सरपंच सूरज पिसाळ, आमदार मकरंद पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विजयराव इथापे, वाई तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक रामदास इथापे, माजी सरपंच मनीषा इथापे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठल माने, केंद्रप्रमुख रवींद्र बाबर, डॉ. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी केंद्रशासनाचा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सबलीकरण पुरस्कार देगाव ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. याबद्दल सरपंच सूरज पिसाळ, उपसरपंच प्रकाश इथापे, ग्रामसेवक संजय खामकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक इथापे, तलाठी गंबरे, आरोग्य सहायक सचिन राठोड, परिचारिका कुमठेकर, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी लसीकरण मोहिमेचे नियोजन केले.