वडूज ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:19+5:302021-05-17T04:37:19+5:30
वडूज : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात रविवारपासून नियोजनानुसार लसीकरण सुरू झाले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला ...
वडूज : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात रविवारपासून नियोजनानुसार लसीकरण सुरू झाले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यास यश मिळाल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव प्रा. नागनाथ स्वामी यांनी दिली.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोविड प्रतिबंधात्मक लस वितरणात कमालीची अनियमितता दिसून येत होती. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ही बाब तालुका आरोग्य अधिकारी खटाव, जिल्हा शल्य चिकित्सक सातारा, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, वडूज यांच्या निदर्शनास आणून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यास योग्य प्रतिसाद मिळून रविवारपासून ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू झाले. याबाबत ज्येष्ठ लाभार्थी समाधान व्यक्त करीत आहेत. ग्राहक पंचायतीच्या या प्रयत्नांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युन्नुस शेख, वैद्यकीय अधीक्षक, वडूज, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, संघटक जयदीप ठुसे यांनी सहकार्य केले.