शाहूपुरी जिल्हा परिषद शाळेत रविवारी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:04+5:302021-06-26T04:27:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शाहूपुरीतील मध्यवस्तीत असलेल्या जिल्हा परिषद कॉलनीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये होणार रविवार दि. २७ जूनला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शाहूपुरीतील मध्यवस्तीत असलेल्या जिल्हा परिषद कॉलनीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये होणार रविवार दि. २७ जूनला लसीकरण करण्यात येणार आहे. शाहूपुरी येथील ओम ग्रुपच्या पाठपुराव्याला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बळ दिल्याने हे केंद्र सुरू झाल्याने शाहूपुरी नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ओम ग्रुप, सातारा युवक कल्याण व क्रीडा मंडळ शाहूपुरी, यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. काही दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाने ओम ग्रुपचे विश्वतेज बालगुडे आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील आवश्यक घटकांना लसीकरण मध्यवर्ती ठिकाणी घेण्यासाठी परवानगी मिळावी, असे निवेदन दिले होते. वेळोवेळी लसीकरण चालू व्हावे यासाठी प्रयत्न चालू होते. त्याचेच यश म्हणजे २७ जूनला जिल्हा परिषद कॉलनीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये लसीकरणाला सुरवात होत आहे.
दरम्यान, लसीकरण सुरू व्हावे यासाठी नगरसेवक अविनाश कदम, शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, राजेंद्र मोहिते, नवनाथ जाधव, शोभा केंडे व सर्व पदाधिकारी कट्टा ग्रुपचे संकेत परामने, तसेच रामदास धुमाळ, दिलीप कडव, महेंद्र गोसावी, कमलेश जाधव, योगेश साळुंख, गणेश वाघमारे, मंगेश जाधव, जितु बाबर, सुरेश पाटील, किशोर निकम या समस्त लोकांचे सहकार्य लाभले.
रविवारी लसीकरणासाठी हे करा
लस ही ४५ वर्षा वरील नागरिकांना मिळणार आहे.
सोबत आधारकार्ड आणणे गरजेचे आहे.
मास्क लावणे बंधनकारक आहे, सॅनिटायजरबरोबर असणे गरजेचे आहे.
सर्वांनी एका रांगेत उभे राहून नियमांचे पालन करत सोशल डिस्टनसिंगचे पालन करने गरजेचे आहे.
कोट :
शाहूपुरी भागाचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे येथील सर्वांना मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण उपलब्ध व्हावे, अशी मागणी ग्रुपच्या वतीने करण्यात आली होती. त्याला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या शब्दांचे बळ मिळाल्याने हे केंद्र सुरू झाले. यासाठी शाहूपुरी भाग आणि ओम ग्रुप प्रशासनाचे आभारी आहोत.
- विश्वतेज बालगुडे, ओम ग्रुप, शाहूपुरी
..................