विलासपूरमध्ये नियोजनामुळे उत्साहात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:25 AM2021-06-28T04:25:59+5:302021-06-28T04:25:59+5:30

सातारा : शासनाच्यावतीने विलासपूर आणि परिसरातील नागरिकांसाठी आयोजित केलेले लसीकरण नियोजनबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले. विलासपूर आणि परिसरातील ...

Vaccination in Vilaspur due to planning | विलासपूरमध्ये नियोजनामुळे उत्साहात लसीकरण

विलासपूरमध्ये नियोजनामुळे उत्साहात लसीकरण

googlenewsNext

सातारा : शासनाच्यावतीने विलासपूर आणि परिसरातील नागरिकांसाठी आयोजित केलेले लसीकरण नियोजनबद्ध

आणि उत्साही वातावरणात पार पडले.

विलासपूर आणि परिसरातील नागरिकांची कोरोना लसीकरणासाठी होणारी परवड पाहून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली विलासपूरमधील ज्येष्ठ पारेख काका, कार्यकर्ते बाळासाहेब महामुलकर, फिरोज पठाण, आशुतोष चव्हाण, अभयराज जगताप या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे विलासपूर आणि परिसरातील नागरिकांसाठी दुसऱ्यांदा विशेष लसीकरण शिबिराचे विलासपूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजन केले होते. सातारा जिल्हा परिषद आणि जिव्हीका हेल्थ

फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वर्षांवरील नागरिकांना दीडशे कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना या लसीकरणाचा लाभ घेता आला.

यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. पवार, डॉ. गोखले यांच्या सहकार्याने जिव्हीका हेल्थ फाउंडेशनच्या डॉ. वीणा काकडे, विशाल सिंह, इर्शाद तांबोळी, सुरज माने, वैद्यकीय सहायक रसिका मयूरी, अंगणवाडी सेविका वैशाली म्हस्के यांनी परिश्रम घेतले. फाउंडेशनच्यावतीने अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकाही तैनात ठेवली होती. लस घेतलेल्या नागरिकांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त केले. या ठिकाणी उभारलेल्या सेल्फी डेस्कवर लसीकरण केलेला आपला फोटो काढत होते.

यावेळी लसीकरण सुसह्य आणि शांततेत होण्यासाठी शिवेंद्रराजे मित्र मंडळाचे निरंजन कदम, प्रकाश पाटील, युवराज जाधव, रवी पवार, संकेत जगताप, सामाजिक कार्यकर्ते विजय देवकर, राजेंद्र चव्हाण, उदय मराठे, मिनीश सावंत, गिरिष सोनार, आसिफ शेख, राजू नलावडे प्रयत्न करत होते.

फोटो २६विलासपूर

विलासपूर येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी डॉ. वीणा काकडे, विशाल सिंह, काका पारेख, बाळासाहेब महामुलकर, फिरोज पठाण उपस्थित होते.

Web Title: Vaccination in Vilaspur due to planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.