राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील वडाच्या झाडास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:29+5:302021-03-17T04:40:29+5:30

नागठाणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ हद्दीत प्रमुख रस्ता आणि सेवारस्ता या दोन्ही रस्त्यांचे मधील एका मोठ्या वडाच्या झाडास ...

Vada tree fire on National Highway service road | राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील वडाच्या झाडास आग

राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील वडाच्या झाडास आग

Next

नागठाणे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ हद्दीत प्रमुख रस्ता आणि सेवारस्ता या दोन्ही रस्त्यांचे मधील एका मोठ्या वडाच्या झाडास मोठी आग लागली. राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड बाजूने साताऱ्याकडे जाताना काशीळ गावच्या हद्दीत प्रमुख रस्ता आणि सेवारस्ता या दोन्ही रस्त्यांच्या मधील एका मोठ्या वडाच्या झाडास दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

मोठी दुर्घटना होण्याची तसेच जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु स्थानिक नागरिकांकडून महामार्ग हेल्पलाईनचे प्रमुख दस्तगीर आगा यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती बोरगाव पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे आणि हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यानंतर हायवे हेल्पलाईनच्यावतीने एक आणि बोरगाव पोलीस ठाण्याकडून अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून एक असे दोन पाण्याचे बंब तत्काळ घटनास्थळी मागवून आग आटोक्यात आणण्यात आली. आगीची तीव्रता खूप मोठी असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु लवकरात लवकर दोन्ही पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यास यश आले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर पुढे होणारी जीवितहानीची आणि नुकसानीची मोठी दुर्घटना टळली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी हायवे हेल्पलाईनचे दस्तगीर आगा तसेच त्यांचे सर्व कर्मचारी आणि बोरगाव पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Vada tree fire on National Highway service road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.