पहाटे फिरणाऱ्या वडूजकरांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:19+5:302021-05-31T04:28:19+5:30

वडूज : वडूज शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वडूज पोलिसांनी मॉर्निंग वॉक व विनामास्क ...

Vaduzkar, who was walking in the morning, was beaten by the police | पहाटे फिरणाऱ्या वडूजकरांना पोलिसांचा दणका

पहाटे फिरणाऱ्या वडूजकरांना पोलिसांचा दणका

Next

वडूज : वडूज शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वडूज पोलिसांनी मॉर्निंग वॉक व विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करत २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पहाटे फिरणाऱ्या वडूजकरांना पोलिसांचा दणक्याने मोठी दहशत बसली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, पोलीस हवालदार चंद्रकांत वाघ, संदीप शेडगे, दीपक देवकर, सविता वाघमारे, रेखा खाडे, अश्विनी देशमुख, पो. काॅ. आण्णा मारेकर, सागर लोखंडे, दऱ्याबा नरळे, गणेश शिरकुळे, भूषण माने, सत्यवान खाडे, अजय भोसले आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता. यापूर्वी विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांची अँटिजन तपासणी करून २३ जणांची तपासणी केली. त्यामध्ये २३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. या तपासणीच्या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या रोडावली असून, दुचाकीस्वारांच्यावर पोलीस प्रशासनाचे दहशत बसली आहे.

सकाळी पेडगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्याचबरोबर शहरात पथके तयार करून विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला. त्यात विनाकारण फिरणे आणि विनामास्क असे मिळून ५६ केसेस करून २८ हजारांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईनंतर वाॅक करणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. अनेकांनी वाॅक करणे बंद करत घरात बसणेच पसंत केले.

३०वडूज

फोटो : वडूज येथे विनाकारण व विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई. ( छाया : शेखर जाधव )

Web Title: Vaduzkar, who was walking in the morning, was beaten by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.