वडूजकरांनो, धोका वाढतोय; काळजी घ्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:41 AM2021-04-28T04:41:54+5:302021-04-28T04:41:54+5:30

वडूज : वडूज शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. वडूज ...

Vaduzkars, the danger is growing; Be careful ..! | वडूजकरांनो, धोका वाढतोय; काळजी घ्या..!

वडूजकरांनो, धोका वाढतोय; काळजी घ्या..!

Next

वडूज : वडूज शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. वडूज शहर हे ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने शहराच्या १७ प्रभागांत कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे धोका वाढतोय, काळजी घ्या, अशी भावनिक साद प्रशासकीय कर्मचारी घालत आहेत.

नगरपंचायत प्रशासनाकडून प्रत्येक बाधिताच्या घरी जाऊन आरोग्याची चौकशी व अडचणी यांची माहिती घेतली जात आहे. मुख्याधिकारी माधव खांडेकर‌, नगरपंचायत प्रशासन कर्मचारी हे स्वत: प्रत्येक बाधिताच्या घरी जाऊन धीर देत आहेत. सुमारे तीस हजार लोकवस्तीच्या वडूज शहराची भौगोलिक व्याप्ती मोठी असून, आरोग्य कर्मचारी अजय हिंमत, आरोग्य सेविका सविता मिसाळ, शोभा घाडगे, १५ आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक सुमित्रा गोडसे, नगरपंचायत कर्मचारी प्रसाद जगदाळे, १५ अंगणवाडी सेविका बाधित रुग्णांच्या घरी जाऊन दैनंदिन आरोग्य तपासणी करीत आहेत. गृह विलगीकरणाची सोय आहे का? हेही तपासून पाहत आहेत. गृह विलगीकरणाची सोय नसेल तर तातडीने संबंधितांची सोय वडूज ग्रामीण रुग्णालयात अथवा खटाव येथील विलगीकरण कक्षात करीत आहेत.

त्याचप्रमाणे ज्या बाधितांना उच्चदाब अथवा मधुमेह यांसारखेआजार आहेत त्यांची दररोज आरोग्य तपासणी करून काळजी घेत आहेत. ‌सद्य:स्थितीत सोमवार, दि. २६ अखेर रात्री उशिरापर्यंत ३६ जणांचे अहवाल कोरोनाबाधीत आले आहेत. वडूज शहरात ६ हजार २८९ जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी १ हजार १८३ जण बाधित आले होते. त्यातील ९४४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर वडूजमधील ३२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर उपचार चालू असलेल्या १८९ रुग्णांपैकी १४३ होम आयसोलेशन तर ४६ जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

नगरपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका आणि कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणारे कर्मचारी सतर्क राहून बाधितांना धीर देत आहेत. वडूज शहरातील रुग्णांची संख्या घटविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, शहरातील आरोग्याची स्वच्छताही ठेवण्यात नगरपंचायत प्रशासनाला यश येत आहे.

Web Title: Vaduzkars, the danger is growing; Be careful ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.