वैष्णवांचा मेळा फलटणकडे मार्गस्थ

By admin | Published: June 26, 2017 02:20 PM2017-06-26T14:20:56+5:302017-06-26T14:20:56+5:30

पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे

The Vaishnavite fair is headed towards Phaltan | वैष्णवांचा मेळा फलटणकडे मार्गस्थ

वैष्णवांचा मेळा फलटणकडे मार्गस्थ

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
तरडगाव आॅनलाईन लोकमत

सातारा , दि. २६ : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील दुसरा मुक्काम तरडगाव येथे करुन सोमवारी पहाटेच फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी शनिवारी सातारा जिल्ह्यात आली. लोणंदमध्ये पहिला मुक्काम करुन रविवारी पालखी मार्गातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे झाले. त्यानंतर तरडगावमध्ये दुसरा मुक्काम केला.

तरडगाव येथील पालखीतळावर सोमवारी पहाटे मानकऱ्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करुन अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास पालखी फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाली. या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.

Web Title: The Vaishnavite fair is headed towards Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.