वालचंद इंडस्ट्रीजच्या कामगारांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 04:01 PM2019-07-11T16:01:48+5:302019-07-11T16:05:00+5:30
सातारारोड, ता. कोरेगाव येथील वालचंद इंडस्ट्रीजमधील कामगारांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी एकत्र येऊन संप पुकारला आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कामगार संघ व राष्ट्रवादी कामगार युनियन या दोन्ही कामगार संघटना एकत्र आल्या आहेत.
सातारा : सातारारोड, ता. कोरेगाव येथील वालचंद इंडस्ट्रीजमधील कामगारांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी एकत्र येऊन संप पुकारला आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कामगार संघ व राष्ट्रवादी कामगार युनियन या दोन्ही कामगार संघटना एकत्र आल्या आहेत.
सातारारोड येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लि., फौंड्री डिव्हिजनमधील सर्व कामगारांनी वेतनवाढ करारासाठी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यावेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रीय कामगार संंघाचे अध्यक्ष अॅड. वसंतराव फाळके यांनी कंपनीच्या गेटवर आंदोलनकर्त्या कामगारांना मार्गदर्शन केले.
कंपनीने सर्व कामगार कायम केल्यामुळे त्यांच्यावर दडपण आले असेल; पण कामगारांना त्यांच्या कामाप्रमाणे मोबदला मिळायला हवा. या कामगारांना कमी पगारात जुन्या मशिनरीवर काम करून उत्पादन करावे लागत आहे. त्यांची पगारवाढ करावी, अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन वेतन वाढीबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.