वाल्मिक पठार जगाच्या नकाशावर !
By Admin | Published: September 5, 2014 09:29 PM2014-09-05T21:29:04+5:302014-09-05T23:22:42+5:30
युवकांनी बनविली वेबसाईट : परिसराच्या विकासासाठीही प्रयत्न
सणबूर : अनेक वर्षापासुन वाल्मिक हे निसर्गरम्य ठिकाण निसर्गप्रेमींपासुन दुर्लक्षित होते. हे ठिकाण जगाच्या नकाशावर आणण्याचे काम वेबसाईट (६६६.५ं’े्र‘्र३ङ्म४१्र२े.ूङ्मे) द्वारे करण्यात आले आहे.
निसर्गप्रेमींच्या प्रतिक्षेत असलेल्या या परिसराची ओळख करून देण्यासाठी युवकांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. सहा वर्षापुर्वी या युवकांनी ही सुरू करून अनेक प्रेक्षणिय स्थळे निसर्गप्रेमींसमोर आणून दिली आहेत. वाल्मिकला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा म्हणून या युवकांनी सतत धडपड केली. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. या ठिकाणाची ओळख व माहिती करून देण्यासाठी या युवकांनी परीसरात माहिती फलकही लावले आहेत.
वाल्मिक हे निसर्गरम्य ठिकाण असुन याठिकाणी प्रत्येकवर्षी मोठी यात्रा भरते. याशिवाय एक आठवडाभर रामनाम जप, हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याचठिकाणी वाल्या कोळ्याने जप करून वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले, अशी आख्यायिका आहे. तसेच वांग नदीचा उगमही येथे झाला आहे. हे सर्व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक ठिकाणचे पर्यटक येथे मोठी गर्दी करतात. (वार्ताहर)
वेबसाईट तयार करणारी टीम
वाल्मिक पठाराची वेबसाईट तयार करण्याचे काम रामानंद पांढरपट्टे, जगन्नाथ पवार, विनायक साबळे या युवकांनी केले आहे. वेबसाईट तयार करण्याबरोबरच हा परीसर प्रेक्षणीय होण्याच्यादृष्टीनेही हे युवक प्रयत्नशिल आहेत. त्यामुळे या युवकांना पाठबळ देणे गरजेचे आहे.
वाल्मिकवर हे पहाल !
लक्ष वेधून घेणारा कंधार धबधबा
इतीहासाचा साक्षिदार प्रचितीगड
सह्याद्रीच्या कुशीतील भैरवगड
मराठवाडी धरणाचे विहंगम दृष्य
निसर्गरम्य वाल्मिकी
महिंद धरण परीसर
सह्याद्रीच्या कुशीतील टेबललॅन्ड