अजिंक्यताऱ्यावर वणवा; जनावरांचा चारा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:09+5:302021-01-08T06:09:09+5:30
सातारा : किल्ले अजिंक्यताऱ्यावर वारंवार वणवा लावला जात असल्याने या परिसरातील येणाऱ्या गुरांचा चारा हिरावला असल्याचे येथील गुराख्यांकडून सांगितले ...
सातारा : किल्ले अजिंक्यताऱ्यावर वारंवार वणवा लावला जात असल्याने या परिसरातील येणाऱ्या गुरांचा चारा हिरावला असल्याचे येथील गुराख्यांकडून सांगितले जात आहे. साताऱ्यातील अजिंक्यातारा किल्ल्याच्या परिसरातील जवळपास सात ते आठ गावांतील गुराखी गुरे घेऊन येतात.
या ठिकाणी दिवसभर गुरे चरत असतात; मात्र अलीकडे वणवा लागल्याने यातील बहुतांशी चारा जळून खाक झाला आहे. अजिंक्यताऱ्यावर मोठ्या गुरांना चारा उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी बारा महिने गुराखी गुरे चारण्यासाठी येत असतात. यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होत आहे. मात्र वारंवार किल्ल्यावर वणवा पेटविला जात असल्याने यातील बहुतांश चारा जळून गेला आहे. यामुळे उपलब्ध चारा वर्षभर पुरणार नसल्याने गुराख्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
........................................................................
करंजेत स्मृतिस्तंभाचे भूमिपूजन
करंजे : करंजे येथे आजी-माजी सैनिक संघटनेचे नियोजित स्मृतिस्तंभाचे भूमिपूजन वेताळ मंदिर परिसरात भूविकास बॅंक चौक येथे आजी-माजी सैनिक व ग्रामस्थांच्याहस्ते आणि उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शंकर कीर्दत, तुषार पाटील, बाळासाहेब ढेकणे, ज्ञानेश्वर फरांदे, जगन्नाथ कीर्दत, राम हादगे, गंगाधर फडतरे, विनित पाटील, अमर इंदलकर, नवनाथ पवार उपस्थित होते.
..............................................................................................
सेवारस्त्यावर अतिक्रमण
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गाकडेला असणाऱ्या सेवारस्त्याकडे रस्ते विकास महामंडळाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची अतिक्रमणे धोकादायक ठरत आहेत. दिवसरात्र या सेवा रस्त्यांवरून होणाऱ्या वाहतुकीत अडथळा आणि अपघातांना सामोरे जावे लागत आहे.