श्रमदानातून साकारले वनराई बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:44+5:302021-01-02T04:55:44+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यात केळघर भागातील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याकरिता शाश्वत स्रोत निर्माण व्हावा. भूजल ...
कुडाळ : जावळी तालुक्यात केळघर भागातील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याकरिता शाश्वत स्रोत निर्माण व्हावा. भूजल पातळीत वाढ होऊन लोकांची पाणी समस्या दूर होण्यास मदत व्हावी या भूमिकेतून जावळीतील कर्मचारी, ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या परिसरात तीन वनराई बंधारे बांधले.
यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनीही येथे श्रमदान केले. पंचायत समिती जावळीकडून दुर्गम, डोंगराळ भागातील जनतेसाठी विविध शासकीय सेवा प्रभावीपणे राबवण्याचे काम गटविकास अधिकारी करत आहेत. केळघर भागातील लोकांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. याकरिता या परिसरातील केळघर, कुरळोशी, पुनवडी याठिकाणी तालुक्यातील ग्रामसेवक, परिसरातील ग्रामस्थ, महिला, शिक्षक यांच्या मदतीने श्रमदानातून ओढ्यावर वनराई बंधारे साकारण्यात आले.
..........................................................
मंडई
वाटाण्याची आवक वाढली
सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे त्याचे दरही कमी झाले आहेत. साहजिकच वाटाण्याला मागणीही वाढत आहे. साताऱ्याच्या बाजारात सरासरी तीस ते चाळीस रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.