पानमळेवाडीच्या ओसाड डोंगरावर बहरणार वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:26 AM2021-07-16T04:26:50+5:302021-07-16T04:26:50+5:30

बामणोली : सातारा तालुक्यातील महामार्गावर असलेल्या पानमळेवाडीचा ओसाड डोंगरावर धरणीमाता फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले असून, या उजाड माळरानावर ...

Vanrai will grow on the barren hill of Panmalewadi | पानमळेवाडीच्या ओसाड डोंगरावर बहरणार वनराई

पानमळेवाडीच्या ओसाड डोंगरावर बहरणार वनराई

Next

बामणोली : सातारा तालुक्यातील महामार्गावर असलेल्या पानमळेवाडीचा ओसाड डोंगरावर धरणीमाता फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले असून, या उजाड माळरानावर वृक्षराजी बहरणार आहे.

निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या धरणीमाता फाउंडेशनने ओसाड उजाड पडलेल्या पानमळेवाडीतील डोंगरावर वृक्षलागवडीचा संकल्प केला आणि उन्हाळ्यातच झाडे लावण्यासाठी खड्डे काढण्यात आले. नुकतेच पुनरागमन केलेल्या मान्सूनच्या आगमनानंतर जांभूळ, भावा, आपटा, लिंबू, चिंच, कवट, वड, पिंपळ, आदी प्रकारच्या शेकडो देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षलागवडीमुळे जमिनीची धूप थांबून जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल तसेच वन्यप्राण्यांचा अधिवास निर्माण होण्यास मदत होईल, अशी आशा संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी राऊत यांनी व्यक्त केली.

उपस्थितांना धरणीमाता फाउंडेशनच्या कार्याची माहिती संस्थेचे सचिव विकास बल्लाळ यांनी दिली. या वृक्षारोपण कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. तसेच पानमळेवाडीचे सरपंच विनोद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हणमंतराव पवार व कुटुंबीय, जाणता राजा क्रीडा मंडळ पानमळेवाडीचे कार्यकर्ते, महेश कोकीळ व इतर मान्यवर उपस्थित होते. धरणीमाता फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुमित काळे व कोषाध्यक्ष आरती दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

१५बामणोली

फोटो - पानमळेवाडी येथील ओसाड डोंगरावर वृक्षारोपण करताना धरणीमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया : लक्ष्मण गोरे)

Web Title: Vanrai will grow on the barren hill of Panmalewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.