जनजीवन उद‌्ध्वस्त करणारे पाणीच ठरले वरदायिनी ; बोटीतून पोहचवली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:06+5:302021-07-30T04:41:06+5:30

सातारा : पाण्यानं त्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं. पण तेच पाणी जोरच्या ग्रामस्थांसाठी वरदायिनी ठरल. रस्त्यावरील ३ मोऱ्या वाहून गेल्याने ...

Vardayini is the water that destroys people's lives; Help delivered by boat | जनजीवन उद‌्ध्वस्त करणारे पाणीच ठरले वरदायिनी ; बोटीतून पोहचवली मदत

जनजीवन उद‌्ध्वस्त करणारे पाणीच ठरले वरदायिनी ; बोटीतून पोहचवली मदत

Next

सातारा : पाण्यानं त्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं. पण तेच पाणी जोरच्या ग्रामस्थांसाठी वरदायिनी ठरल. रस्त्यावरील ३ मोऱ्या वाहून गेल्याने तसेच ५-६ ठिकाणी मोठ्या दरडी कोसळ्याने मदतकार्यात अडथळे उभे राहिले. त्यामुळे प्रशासनाने बोटीने जोर गावापर्यंत पोहचून अन्नधान्य तसेच रग, ब्लँकेट आदी साहित्य पोहोच केले.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागाला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला जिल्ह्यात भूस्खलनाचे पहिली घटना कोंढावळे गावात घडली यामध्ये

कोंढावळे गावातील तीन जणांचा मृत्यू झाला. याच भागात जोर येथील दोन जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ते अद्याप बेपत्ता आहेत. जांभळी येथेही भूस्खलन झाले. वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की ‘अतिवृष्टीमुळं कोंढावळे गावातील २७ घरांचं नुकसान झाले आहे. त्यांचंही पर्यायी स्थलांतर करण्यात आले आहे.

मेणवली येथील २० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. सर्व ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. उद्यापर्यंत पंचनामे पूर्ण होतील.’

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे दळणवळणाचा रस्त्यावरील संपर्क पूर्णपणे तुटला काही ठिकाणी मोरया वाहून गेल्या दोन तीन ठिकाणी दरडी कोसळल्या तर पुराच्या पाण्याचा लोंढा इतका मोठा होता की माणसालाही त्या पाण्यातून पलीकडे जाणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत प्रशासनाने जलमार्गे बोटीतून मदत पोहोचवली.

या बाधित कुटुंबांना शासनातर्फे गहू, तांदूळ, डाळ, रॉकेल असे साहित्य देण्यात आले आहे. कोंढावळेमधील सात घरांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे लागणार आहे. धोकादायक स्थितीमुळे उर्वरित कुटुंबे तात्पुरती स्थलांतरित करण्यात आली आहेत. वाई तालुक्यातील १३० घरांची पडझड झाल्यानं ती अंशतः बाधित असल्याचे तहसीलदार भोसले यांनी सांगितले.

चौकट ..

वाई तालुक्यातील बाधित कुटुंबे

कोंढावळे २९

जांभळी ३

मेणवली २०

जोर १४२

गोळेवाडी ६४

गोळेगाव १७

पाचवड ९

एकूण २८४ कुटुंबे

कोट ...

‘अतिवृष्टीमुळे जनसंपर्क तुटल्यामुळे जोर भागातील बाधित कुटुंबांना मदत पोहचवण्यासाठी मोठे अडथळे निर्माण झाले मात्र बोटीतून अन्नधान्य व गरजेच्या वस्तू बाधित कुटुंबांपर्यंत पोहचवल्या. कोसळणाऱ्या पावसात एका बाजूला बचावकार्य आणि दुसऱ्या बाजूला मदत कार्य सुरू आहे’

रणजित भोसले

तहसीलदार वाई

Web Title: Vardayini is the water that destroys people's lives; Help delivered by boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.