खराडे येथे बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:50+5:302021-07-30T04:40:50+5:30

मसूर : खराडे (ता. कऱ्हाड) येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या ...

Various programs held on the occasion of Balasaheb Patil's birthday at Kharade | खराडे येथे बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

खराडे येथे बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Next

मसूर : खराडे (ता. कऱ्हाड) येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान, महापुरामुळे बाधित लोकांना मदत करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करणे आदी उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ खराडे यांच्यावतीने साजरे करण्यात आले.

यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कवठे गावचे सरपंच लालासाहेब पाटील, कऱ्हाड पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, खराडेच्या सरपंच सुनीता कदम, उपसरपंच विक्रम गुरव, ग्रामपंचायत सदस्य मोहन बर्गे, बाळासाहेब जाधव, सविता जाधव, वैशाली मदने, सिंधूताई जाधव, संगीता कांबळे, माजी उपसपंच भिकोबा जाधव, ग्रामसेवक रमेश माळी, शासकीय कंत्राटदार दीपक जाधव, माजी सैनिक मच्छींद्र जाधव, बाबुशेठ जाधव, संजय कदम, भय्या जाधव, सुभाष जाधव, आबा कांबळे, शरद कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेस, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रेल्वे गेट ते जुने गावठाणपर्यंत ग्रामस्वच्छता करण्यात आली व बरीच वर्षे बंद असलेला स्मशानभूमीकडे गावातून जाणारा रस्ता खुला करण्यात आला. २०० फोम जातीची शोभेची झाडे लावण्यासाठी नितीन चव्हाण, शैलेश कदम, हरिदास जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश जाधव, अनिल जाधव यांनी मदत केली. या कार्यक्रमाची सांगता खराडेच्या सरपंच सुनीता कदम यांनी महापूर मदत कक्षाला मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांना करून उपस्थितांचे आभार मानत केली.

फोटो कॅप्शन - खराडे (ता. कऱ्हाड) येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Various programs held on the occasion of Balasaheb Patil's birthday at Kharade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.