तालुकास्तरीय विविध स्पर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:33+5:302021-04-26T04:35:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : बालदिनाचे औचित्त्य साधून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पहिली ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : बालदिनाचे औचित्त्य साधून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना संधी देण्यासाठी आयोजित तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर ऑनलाइन विविध स्पर्धांमध्ये फलटण तालुक्यातील विद्यार्थी/विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे.
तालुकास्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर झाले आहेत. तालुकास्तरीय निकाल खालीलप्रमाणे भाषण स्पर्धा ईश्वरी जगताप, पवारवाडी विडणी, स्वराज महेश ननावरे, निंबळक, संघर्ष नीलेश जगताप, पवारवाडी विडणी. पत्रलेखन स्पर्धा यशदा गायकवाड, सासवड, कल्याणी सावंत निंबळक, प्रगती बनकर, माळवाडी सांगवी.
स्वलिखित कविता वाचन स्पर्धा प्रांजली शिंदे, तांबवे, अनुष्का औंदे, ढमाळटेक पिंप्रद, समृद्धी शेडगे, हिंगणगाव. नाट्यछटा/एकपात्री अथर्व गायकवाड, तरडगाव, श्रुतिका पाचगणे शेरेचीवाडी हिंगणगाव. शुभम कृष्णाथ गुरव शेरेचीवाडी हिंगणगाव. पोस्टर तयार करणे स्पर्धा गौरी जेजुरकर, फलटण, आकांक्षा महादेव शिंदे तांबवे, आर्यन अडसूळ, फलटण.
निबंध लेखन स्पर्धा साक्षी माने, फलटण, विजया कदम, फलटण, स्नेहा श्रीवास्तव, फलटण.
निबंध लेखन स्पर्धा प्रियंका बोबडे, फलटण, आदित्य भगत, गौरी संग्राम जेजुरकर फलटण. व्हिडिओ तयार करणे स्पर्धा सौरभ कोरडे, फलटण. बालसाहित्य इ-संमेलन स्पर्धा माधुरी ननावरे, फलटण, अनिकेत जाधव, फलटण, सौरभ कोरडे, फलटण.
घरी बसून स्पर्धेत ऑनलाईन सहभागी व्हावयाचे असल्याने विद्यार्थी/विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे, मात्र सहभागी प्रत्येक स्पर्धकाचे सहभाग प्रमाणपत्र संकेत स्थळावरुन काढता येणार आहेत.