वर्णे-आबापुरीचा वार्षिक भंडारा उत्सव यंदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:53 AM2021-02-26T04:53:17+5:302021-02-26T04:53:17+5:30
अंगापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील वर्णे-आबापुरी येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथाचा वार्षिक भंडारा उत्सव यंदा प्रशासनाच्या आदेशानुसार रद्द ...
अंगापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील वर्णे-आबापुरी येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथाचा वार्षिक भंडारा उत्सव यंदा प्रशासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
रविवारी (दि. २८) होणारा हा उत्सव शासकीय आदेशानुसार स्थगित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने सरकारी यंत्रणेने सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी घातली आहे. तसेच कोणत्याही कारणासाठी गर्दी जमविणे दखलपात्र गुन्हा ठरणार आहे. त्यामुळे वार्षिक यात्रेपूर्वी महिनाभर आधी होणाऱ्या या भंडाऱ्यासाठी जिल्ह्यातील तसेच पर जिल्ह्यातील भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा शुक्रवारी होत असलेल्या पौर्णिमेला देवाचे पारधीवरून (शिकार) आगमन होणार असून, या कार्यक्रमासदेखील मानकरी, चाकर, देवस्थान विश्वस्त व निवडक ग्रामस्थांच्या उपस्थितीत राहतील. इतर कोणीही यास हजेरी न लावता देवस्थानास सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.