पावसाच्या तालुक्यालाच प्रतीक्षा वरुणराजाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:06+5:302021-06-30T04:25:06+5:30

रामापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या पाटण तालुक्यात जून महिना संपत आला तरी दमदार पावसाला सुरुवात झालेली नाही. ...

Varun Raja is waiting for the rainy taluka | पावसाच्या तालुक्यालाच प्रतीक्षा वरुणराजाची

पावसाच्या तालुक्यालाच प्रतीक्षा वरुणराजाची

Next

रामापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या पाटण तालुक्यात जून महिना संपत आला तरी दमदार पावसाला सुरुवात झालेली नाही. काळे ढग जमा होतात; पण पाऊसच पडत नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

सातारा जिल्ह्यात मान्सूनची सुरुवात याचा तालुक्यातून होत असते. याही वर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली. त्यामुळे कोयना, नवजा आणि महाबळेश्वर या ठिकाणी चागल्या पावसाच्या नोंदी झाल्यामुळे कोयना धरणातही पाण्याची चागली आवक झाली. परंतु गेली काही दिवसांत पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकऱ्याची चिंता वाढत आहे. पावसाकरिता आकाशामध्ये काळे ढग जमा होत आहे, पण जोरदार पाऊस पडत नाही. या आलेल्या काळ्या ढगांकडे शेतकरी आस लावून बसलेले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पेरणी उरकली पण जोरदार पावसावर अवलंबून असलेली पाटण तालुक्याची महत्त्वाची भात लागण अजून पूर्ण होऊ शकली नाही.

तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्याची खरिपाची पेरणी उरकून घेतली. त्यानंतर पडणाऱ्या पावसाने पिके चांगलीही आली. त्या पिकांना आता खताची गरज आहे. पण पावसाने दडी मारल्याने पिकांना खते देता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील खरीप पिकांना आता पावसाची खूपच गरज आहे. दोन-चार दिवसांत पाऊस पडला नाही तर डोंगर उतारावर असणाऱ्या शेतकरी शेतीत दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. पाटण हा सह्याद्रीच्या डोगररांगालागून असलेला तालुका डोंगराळ दुर्गम असला तरी सर्वाधिक पावसाचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. या तालुक्यात जवळपास ७ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. पाटण तालुक्यात पडणाऱ्या सार्वधिक पावसामुळे तालुक्यात मोरणा तारळे यासारखे लहान-मोठे प्रकल्प उभे राहील या प्रकल्पातून तालुक्यातील काही गावांचा सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही अंशी कमी झाला आहे.

महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी म्हणून समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत दहा टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. कोयना धारणामुळे महाराष्ट्रातील जनतेची वीज, कोयना नदीकाठच्या गावांच्या सिचन, आणि महाराष्ट्रासह कर्नाटक यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जाते. यामुळे हे धरण भरणे अत्यंत गरजेचे आहेत. त्याकरिता पाटण तालुका आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे.

धरणातील स्थिती

गेल्या वर्षी यावर्षी

पाणीसाठा ३२.२२ टीएमसी ४२.५२ टीएमसी

आवक २२०३ क्युसेक ४७१० क्युसेक

विसर्ग २,१०० क्युसेक २,१०० कुसेक्स

Web Title: Varun Raja is waiting for the rainy taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.