वसंतराव नाईक यांचे काम शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:29+5:302021-07-02T04:26:29+5:30
पाचवड : ‘प्रतिकूल परिस्थितीत वसंतराव नाईक यांच्याकडे राज्याच्या नेतृत्वाची धुरा आली. शेती आणि शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य करून त्यांच्या जीवनात ...
पाचवड : ‘प्रतिकूल परिस्थितीत वसंतराव नाईक यांच्याकडे राज्याच्या नेतृत्वाची धुरा आली. शेती आणि शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य करून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देण्याचे काम दिवंगत वसंतराव नाईक यांनी केले. राज्य अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध स्वयंपूर्ण करीत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध केले,’ असे प्रतिपादन किसन वीर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत इंगवले यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत हरितक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषिदिन किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, मधुकर शिंदे, गजानन भोसले, अनिल वाघमळे, आर. जे. सणस, विठ्ठलराव कदम, अशोक डमाळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.