वासोटा पर्यटन, बोटिंग पूर्ववत होणार, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; बोटिंग क्लब व्यावसायिकांमध्ये समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 05:33 PM2022-01-31T17:33:27+5:302022-01-31T17:33:57+5:30

वासोटा पर्यटन आणि बोटिंग बंद असल्याने पर्यटनाशी निगडित सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

Vasota tourism, boating will be undone, follow up of MLA Shivendrasinharaje bhosle | वासोटा पर्यटन, बोटिंग पूर्ववत होणार, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; बोटिंग क्लब व्यावसायिकांमध्ये समाधान

वासोटा पर्यटन, बोटिंग पूर्ववत होणार, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; बोटिंग क्लब व्यावसायिकांमध्ये समाधान

googlenewsNext

सातारा : कोरोना महामारीमुळे दोन महिन्यांपासून वासोटा पर्यटन बंद होते. त्यामुळे बामणोली परिसरातील बोट मालक, चालक आणि इतर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, सोमवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनसंरक्षक (वन्यजीव) समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधून वासोटा पर्यटन, बोटिंग त्वरित पूर्ववत सुरू करण्याची सूचना केली. यानंतर चव्हाण यांनी मंगळवार, दि. १ फेब्रुवारीपासून वासोटा पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला.

वासोटा पर्यटन आणि बोटिंग बंद असल्याने दोन महिन्यांपासून बामणोली परिसरातील बोट मालक, चालक आणि पर्यटनाशी निगडित सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. वासोटा पर्यटन आणि बोटिंग पूर्ववत सुरू व्हावे, यासाठी भैरवनाथ बोट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली आणि वासोटा पर्यटन आणि बोटिंग सुरू करून देण्याची मागणी केली.

यावेळी भैरवनाथ बोट क्लबचे अध्यक्ष धनाजी संकपाळ, उपाध्यक्ष संजय शिंदकर, सचिव नीलेश शिंदे, सुभाष शिंदकर, राजेंद्र संकपाळ, राजेंद्र कांबळे, गोविंद शिंदकर, किसन भोसले यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

बामणोली भागातील बोटिंग आणि इतर व्यवसाय पर्यटनावर अवलंबून असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वासोटा पर्यटन बंद ठेवण्यात आले आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटन सुरू आहे. सर्व ठिकाणी सर्वकाही सुरू असताना कोरोनाचे कारण दाखवून वासोटा पर्यटन बंद ठेवणे म्हणजे बामणोली परिसरातील बोट चालक, मालक आणि पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इतर सर्व व्यावसायिकांवर अन्याय करणे आहे. त्यामुळे किल्ले वासोटा पर्यटनासाठी त्वरित परवानगी द्या, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चव्हाण यांना दिल्या. 

यानंतर चव्हाण यांनी मंगळवारपासून किल्ले वासोटा पर्यटन सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले. यांनतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशीही संपर्क साधून वासोटा पर्यटन आणि बोटिंग सुरू होत असून, महसूल विभागाने व्यावसायिकांना सहकार्य करावे, असे सांगितले.

Web Title: Vasota tourism, boating will be undone, follow up of MLA Shivendrasinharaje bhosle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.