वासुदेव आले दहीवडीत दारोदारी स्वच्छतेला : महास्वच्छता अभियान १५ डिसेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:53 AM2018-12-12T00:53:49+5:302018-12-12T00:54:37+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायत उतरणार असून, यासाठी दहिवडी परिसरात स्वच्छतेचा संदेश देणारे वासुदेव भल्या पहाटे दहिवडी शहराततून हिंडत आहेत. त्याच बरोबर
दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायत उतरणार असून, यासाठी दहिवडी परिसरात स्वच्छतेचा संदेश देणारे वासुदेव भल्या पहाटे दहिवडी शहराततून हिंडत आहेत. त्याच बरोबर पथनाट्याचे पथक दहिवडीतील चौकाचौकात स्वच्छतेवर आधारित आपली कला सादर करत आहेत. जनतेचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मायणी एसटी स्टँड चौक, मार्डी चौक, बाजारपटांगण दहिवडी, कॉलेज परशुरामशेठ कन्या विद्यालय जिल्हा परिषद शाळा नगरपंचायत या वर्दळीच्या ठिकाणी कला पथकाने जनजागृती केली आहे. नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.
महास्वच्छता अभियान १५ तारखेला होणार असून, हजारो हात पुढे येऊन सर्व परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार दहिवडीकर करीत आहेत.माण तालुक्याला लोकसहभागातून काम करण्याची आता सवयच जडली आहे. वॉटरकपनंतरस्वच्छतेमध्ये असणारा पाच हजार मार्कांचा पेपर सोडवून जवळपास ४०० नगरपंचायतींमधून नंबर मिळवायचा, यासाठी दहिवडीकर सरसावले आहेत. यासाठी सोशल मीडियाचा वापर करून स्वच्छतेचा अॅप डाऊनलोड करून या स्पर्धेची माहिती घरोघरी देण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या १५ तारखेला पूर्ण क्षमतेने शहरातील सर्व मंडळी राजकीय गटातटाला फाटा देत दहिवडी शहरासाठी एकत्र येत असून, हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.
१५ तारखेला होणाºया महास्वच्छता अभियानात शाळा महाविद्यालये कॉलेज, डॉक्टर्स मेडिकल अॅकॅडमी, बँका, पतसंस्था, गणेश मंडळे, व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचारी, आर्ट आॅफ लिव्हिंग टीम, अंगणवाडी सेविका आशा यांच्यासाह विविध क्षेत्रात काम करणाºया सामाजिक संस्था यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. अनेक संस्थांनी श्रमदान करून लाखो रुपयांची मदत केली होती. त्यामुळे दहिवडीमधील ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी सरसावले आहेत.
ग्रामस्थांचा बक्षीस जिंकण्याचा निर्धार
दहिवडी शहराने या स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेतल्यानंतर १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या महिन्यात एक कमिटी येऊन पाहणी करणार आहे. या कालावधीत दहिवडीच्या रोजच्या स्वच्छतेची तसेच ५००० मार्कांची पाहणी करणार आहे. बक्षीस जिंकण्याचा निर्धार दहिवडीकरांतून व्यक्त होत आहे. शहरात स्वच्छतेच्या माहितीचे फलक लावण्यात आले आहेत.