कचऱ्यातली भाजी चक्क बाजारपेठेत विक्रीला ! साताऱ्यातील प्रकार : अंधाराचा आसरा घेऊन सुरू आहे बिनभांडवली धंदा; आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:13 AM2018-01-16T00:13:24+5:302018-01-16T00:13:50+5:30

सातारा : व्यापारी आणि शेतकºयांनी टाकून दिलेल्या भाजीतून निवडक भाजी पुन्हा एकदा विक्रीसाठी मंडईत येऊ लागली आहे.

Vegetable in the trash sold in the market! Types of Saturn: With the prospect of darkness, continuous business is done; Healthy questions are serious | कचऱ्यातली भाजी चक्क बाजारपेठेत विक्रीला ! साताऱ्यातील प्रकार : अंधाराचा आसरा घेऊन सुरू आहे बिनभांडवली धंदा; आरोग्याचा प्रश्न गंभीर

कचऱ्यातली भाजी चक्क बाजारपेठेत विक्रीला ! साताऱ्यातील प्रकार : अंधाराचा आसरा घेऊन सुरू आहे बिनभांडवली धंदा; आरोग्याचा प्रश्न गंभीर

Next

सातारा : व्यापारी आणि शेतकºयांनी टाकून दिलेल्या भाजीतून निवडक भाजी पुन्हा एकदा विक्रीसाठी मंडईत येऊ लागली आहे. दिवसभर मिळेल ते काम करणं आणि संध्याकाळी मंडईच्या कचराकुंडी लगत पडलेली भाजी वेचून त्याची विक्री करणं, हा वयस्क महिला आणि पुरुषांचा व्यवसाय बनू लागल्याची धक्कादायक बाब उघड झाली
आहे.

साताऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भल्या पहाटे शेतकऱ्यासह व्यापाºयांची गर्दी असते. रविवार आणि गुरुवार या आठवड्यातून दोन दिवस मंडईचे असले तरीही रोज सकाळी ताजी मंडई नेणाºयांचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. सकाळी सहा ते नऊ या वेळेत ही मंडई भरलेली असते. त्यानंतर मात्र शेतकरी शिल्लक राहिलेला खराब माल रस्त्यालगत किंवा कचराकुंडी शेजारी जनावरांना खायला पाला म्हणून टाकून जातो. नेमकं याच ठिकाणी जाऊन या महिला घाणीतील त्यातील बरी असलेली भाजी गोळा करून पिशवीत भरतात. त्यांचा हा बिनभांडवली अनेक सामान्यांच्या प्रकृतीवर आघात करणारा ठरू शकतो.

सकाळ होताच बाजार समितीत एन्ट्री
सकाळी नऊ वाजता मंडई उठली की या महिलांची बाजार समितीत एन्ट्री होते. त्यानंतर कचराकुंडी शेजारून गोळा केलेली भाजी, पिकलेली वांगी, डागाळलेला फ्लॉवर, तुकडे झालेल्या हिरव्या मिरच्या, नरमलेली मेथी आदी भाज्या त्या त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात. सरासरी पन्नास ते शंभर रुपयांची भाजी गोळा केल्याशिवाय त्या हा परिसर सोडत नाहीत. रात्री अंधाराचा आसरा घेऊन या महिला भाजी विक्रीसाठी बसतात.

हेडलाईटच्या उजेडात विक्री
मंडईतून गोळा करण्यात आलेली ही भाजी प्रकाशात खराब झालेली दिसते. भाजीचे खरे स्वरूप लक्षात येऊ नये म्हणून या वयस्कर महिला राजवाडा बसस्थानकापाशी अंधारात बसतात. अनेकदा गरिबाला मदत करण्याच्या उद्देशाने येथे भाजी खरेदी करणारे ग्राहक येतात. फसवणूक झाल्याचे घरी गेल्यावर लक्षात येते.

म्हणून एवढीच भाजी
अंधारात बसलेल्या या भाजी विक्रेत्यांना एवढी कमी भाजी घेऊन का बसता? असे विचारल्यावर त्या, ‘भाजी विकत घ्यायला पैसं न्हाईत. होत्या तेवढ्या पैशात एवढीच भाजी आली. म्हणून मग एवढीच भाजी आणली विकायला’, असे स्वच्छ उत्तर अत्यंत निरंक चेहºयाने त्या देतात.

Web Title: Vegetable in the trash sold in the market! Types of Saturn: With the prospect of darkness, continuous business is done; Healthy questions are serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.