चक्क छतावर पिकतोय सेंद्रिय भाजीपाला

By Admin | Published: December 14, 2015 08:34 PM2015-12-14T20:34:33+5:302015-12-15T00:50:01+5:30

ही रानवाट वेगळी...यशवंतनगरच्या गुरुजींची घरावर शेती

Vegetable vegetable grown on a chic roof | चक्क छतावर पिकतोय सेंद्रिय भाजीपाला

चक्क छतावर पिकतोय सेंद्रिय भाजीपाला

googlenewsNext

रोजच्या पालेभाज्या पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्याचा आरोग्यावर दुर्गमी परिणाम होतो. हे टाळायचं असेल, आपलं आणि आपल्या कुटुंबाला निरोगी पाहण्यासठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. याचा विचार करून शाळेतील अध्यापनाबरोबरच बंगल्याच्या टेरेसवर वाफे तयार करून व कुंड्यांमधून भाजीपाल्याची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग वाई येथील यशवंतनगरमधील गणेश सोसायटातील वसंत नारायण चावरे या माध्यमिक शिक्षकाने यांनी केला आहे़
डिसेंबर २००१ मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टेरेस गार्डनचे मॉडेल पाहिले़ त्यापासून बंगल्याच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत व गच्चीवर फुलांच्या झाडांबरोबरच पालेभाज्या पिकविण्याची कल्पना सुचली. घराच्या ४० बाय १८ लांबी रुंदीच्या गच्चीवर सहा बाय तीनचे वाफे तयार केले़ साधारण तीन वीटांचा उभा थर तयार केला़ स्लॅबपर्यंत पाणी पोहचू नये म्हणून त्याखाली प्लास्टिकचा कागद टाकला व वाफ्यात साधी माती भरली, सेंद्रिय खतांचाच वापर केला जातो़
जूनच्या शेवटच्या आठवड्यात वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली जाते़ पाऊस असल्याने फारसे पाणी घालावे लागले नाही़ यथावकाश चांगले वेल तयार होतात. काकडी, दोडका, घोसाळी, घेवडा यासारख्या भाज्या चांगल्याप्रकारे बहरल्या आहेत़
वाफ्यांची संख्या वाढली़ मेथी, चाकवत, तांबडे पांढरे मुळे, वांगी, कोबी, फ्लॉवर, मिरची, कोथिंबीर, तोंडली, पालक, आले, भेंडी आदी पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन सध्या घेत आहेत़ सकाळ संध्याकाळ केवळ अर्धा तास पाणी देण्यासाठी वेळ द्यावा लागतो़ यामुळे पंधरा वर्षे ताज्या व सेंद्रिय भाज्या खाल्ल्याचा आनंद मिळत आहे़ सध्या टेरेसवर सात वाफे व कुंड्या आहेत़. परिसरातील महिला व पुरूष बाग बघण्यास येतात़ --पांडुरंग भिलारे

महागाईच्या दिवसांत प्रत्येकाने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेप्रमाणे सेंद्रिय शेती केल्यास आपल्या गरजा भागतात. एक छंद जोपासला जातो तसेच पर्यावरणालाही मदत होते. संपूर्ण भाजी हा सेंद्रिय खतांचा वापर केल्याने आरोग्यदायी आहे़
- वसंत चावरे

Web Title: Vegetable vegetable grown on a chic roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.