भाजी परत मिळेल जीव मिळणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:39+5:302021-04-22T04:40:39+5:30

सातारा : सातारा शहरांमध्ये गजबजलेल्या ठिकाणी तसेच मंडईमध्ये भाजीखरेदीसाठी केली. ही गर्दी पाहून साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात माईक घेऊन ...

Vegetables will be returned, life will not be found! | भाजी परत मिळेल जीव मिळणार नाही !

भाजी परत मिळेल जीव मिळणार नाही !

Next

सातारा : सातारा शहरांमध्ये गजबजलेल्या ठिकाणी तसेच मंडईमध्ये भाजीखरेदीसाठी केली. ही गर्दी पाहून साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात माईक घेऊन जनजागृती केली. मास्क वापरण्यासाठी लोकांपुढे लोटांगण घालून भाजी परत मिळेल जीव मिळणार नाही, असे म्हणत गांधीगिरी मार्गाने लोकांना समज दिली.

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच किराणा मालाची दुकाने, भाजीमंडई व इतर जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानावर मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत किराणामाल व इतर जीवनावश्यक वस्तू विक्रीला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले तर खायला, प्यायला काही मिळणार नाही, या भीतीमुळे बुधवारी लोकांनी शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

विशेषतः सातारा शहरातील भाजी मंडईमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्ध गेल्या दोन वर्षांपासून जनजागृती करणारे कार्यकर्ते शशिकांत पवार, विनीत पाटील यांनी बुधवारी एक मोहीम हाती घेतली. हातामध्ये कर्णा घेऊन सकाळी बाहेर पडले.

रविवार पेठेतील भाजी मंडई, गोडोली अशा गजबजलेल्या ठिकाणी ते चालत फिरले. माइकवरून लोकांना गर्दी न करण्याबाबतचे आवाहन ते करत होते. मास्क का घातला नाही, अशी विचारणादेखील लोकांना करत होते. अनेकांनी मास्क कानाला अडकवले होते. मात्र हनवटीवर लावून ठेवले होते. अनेक जण खरेदी करताना दिसत होते. विनीत पाटील आणि शशिकांत पवार यांनी मास्क तोंडावर काढू नका आणि गर्दी कमी करा भाजी पुन्हा मिळेल जीव मिळणार नाही, असे भावनिक आवाहन लोकांना केले.

अनेक जण हे आवाहन करूनदेखील गंभीर नसल्याचे पाहायला मिळाले. मास्क लावतो की म्हणणारे अनेक जण त्यांना भेटले. त्यांच्यासमोर या कार्यकर्त्यांनी अक्षरश लोटांगण घातले. त्यांचे पाय धरून दादा, ताई कोरोनाची लाट पसरलेले आहे, जीव महत्त्वाचा आहे. याचा प्रसार थांबवायचा आहे, अशी विनंती करताना पाहायला मिळत होते.

गांधीगिरीची शहरभर चर्चा

शहरामध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या गांधीगिरीची चर्चा रंगली होती. शासकीय यंत्रणा कामांमध्ये गुंतलेले असताना लोकांचे सहकार्य मिळाले नाही तर दुसरी काय तिसरी लाटदेखील उचलून मोठा हाहाकार माजू शकतो. हे लक्षात घेऊन सामाजिक जाणीव असलेले कार्यकर्ते काम धंदा सोडून शहरभर लोकांना जनजागृती करताना दिसले. या कार्यकर्त्यांच्या गांधीगिरीची शहरभर चर्चा सुरू होती.

Web Title: Vegetables will be returned, life will not be found!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.