बाभळीचे झाड पडून वाहनाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:35 AM2021-08-01T04:35:47+5:302021-08-01T04:35:47+5:30
धामणेर : रहिमतपूर-तारगाव रोडवर बाभळीचे झाड वाहनावर पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने यावेळेस कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत ...
धामणेर : रहिमतपूर-तारगाव रोडवर बाभळीचे झाड वाहनावर पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने यावेळेस कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत माहिती अशी, रहिमतपूर-तारगाव रस्त्यावर बोरगावनजीक रस्त्याच्या बाजूला अनेक बाभळीची झाडे आहेत. कित्येक वर्षांची ही झाडे आहेत. पावसामुळे ती रस्त्यावर पडत आहेत. रस्त्यावरून गाडी (एमएच ११ बीव्ही ६७९५), जरंडेश्वर शुगर मिल लिमिटेड, चिमणगाव (ता. कोरेगाव) यांची गाडी भरधाव वेगाने कोरेगाववरून मसूरला रस्त्याने जात असताना गाडीवर अचानक बाभळीचे झाड पडले; परंतु सुदैवाने चालकाला कोणतीही इजा झाली नाही. गाडीचे मात्र नुकसान झालेले आहे. मागील आठवड्यात गुजरवाडीनजीक याच रस्त्यालगत विद्युतखांबावर बाभळीचे झाड पडल्यामुळे दोन दिवस या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रस्त्यालगत कुठलीही साइडपट्टी भरलेली दिसत नसल्यामुळे पाऊस पडला की, गाड्या घसरून पडत आहेत. त्यामुळे लोकांनी रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करावे, अशी मागणी केली आहे.