आनंदराव चव्हाण पतसंस्थेकडून वाहन वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:39 AM2021-03-31T04:39:28+5:302021-03-31T04:39:28+5:30
सणबूर : आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या पाटण शाखेच्या वतीने सलतेवाडी बिबी, ता. पाटण येथील ...
सणबूर : आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या पाटण शाखेच्या वतीने सलतेवाडी बिबी, ता. पाटण येथील नारायण शंकर जाधव यांना दुचाकीचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाखा सल्लागार महिपती जाधव, निवृत्ती जाधव, नीलेश जाधव, लक्ष्मण चौधरी, लक्ष्मण संकपाळ, शाखाप्रमुख रूपेशकुमार भोई, भूषण घाडगे, गणेश संकपाळ, अनिता घाडगे, स्वाती मोळावडे उपस्थित होते.
शाखेच्या प्रगतीबाबत बोलताना रूपेशकुमार भोई म्हणाले, ‘पाटण शाखेने अठरा वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून कारभार केला. यामुळे लोकांचा संस्थेवर विश्वास वाढत चालला आहे. पाटण शाखेने अठरा वर्षात पाच कोटी ठेवी जमा केल्या आहेत. तीन कोटी सत्तर लाख रुपये कर्ज वितरण केले आहे. ही शाखा पाटणवासीयांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील व संस्थापक हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे.’ (वा. प्र.)
फोटो ३०सणबूर-एडीव्हिटी
पाटण येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत नारायण जाधव यांना दुचाकी वितरण केले. यावेळी महिपती जाधव, निवृत्ती जाधव, नीलेश जाधव, रूपेशकुमार भोई उपस्थित होते.