वेण्णा नदीचा पूल देतोय अपघाताला निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:19+5:302021-07-31T04:39:19+5:30

किडगाव : सातारा ते वाई मार्गावर असणाऱ्या वर्ये (ता. सातारा) येथील वेण्णा नदीच्या पुलाचे कठडे तुटले असल्याने हा पूल ...

Venna river bridge invites accident! | वेण्णा नदीचा पूल देतोय अपघाताला निमंत्रण!

वेण्णा नदीचा पूल देतोय अपघाताला निमंत्रण!

googlenewsNext

किडगाव : सातारा ते वाई मार्गावर असणाऱ्या वर्ये (ता. सातारा) येथील वेण्णा नदीच्या पुलाचे कठडे तुटले असल्याने हा पूल सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे.

गेली काही दिवसांपासून या पुलाच्या कठड्याची दुरावस्था झाली आहे. या पुलाच्या कठड्यावर रात्री मोठे वाहन धडकल्याने हा लोखंडी कठडा तुटल्याने नदीपात्राच्या दिशेला लोंबकळले अवस्थेत आहे. सातारा ते वाई मार्गावर हा महत्त्वाचा पूल समजला जातो. मुंबई, पुणे, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, नेले किडगाव, धावडशी, रामनगर परिसरात या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. साताऱ्याच्या दिशेने या पुलावरून येत असताना धोकादायक वळण ही आहे. त्यामुळे नवख्या वाहनचालकाला हा पूल दिसतच नाही. पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्याचबरोबर पुलाच्या कोपऱ्यात येथील स्थानिक रहिवासी तसेच येणारे जाणारे मोठ्या प्रमाणात येथे केरकचरा टाकत असल्याने येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.

हा पूल ब्रिटिशकालीन पूल म्हणून ओळखला जातो याचे नूतनीकरण होऊन जवळपास आठ ते दहा वर्षे झाली. त्यावेळेला या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण लोखंडी कठडे उभे केले गेले. मात्र, त्या वेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हे लोखंडी कठडे अत्यंत कमकुवत झाल्यामुळे ते तुटू लागलेले आहेत. लोखंडी कठड्याला गंज पकडलेला आहे. त्याला असणारा रंगही गायब झालेला आहे. सध्या ज्या ठिकाणी हा लोखंडी कठडा तुटला आहे, तो वाहनधारकांना वळणाचा रस्ता असल्याने दिसत नाही.

चौकट..

कठड्यांची दुरुस्तीची मागणी...

रात्री-अपरात्री या पुलावर मोठा अपघात घडू शकतो. आतापर्यंत या ठिकाणावरून अनेक छोटी मोठी वाहने सरळ नदीपात्रात गेली आहेत. मात्र, दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या संरक्षण कठड्यांमुळे या पुलाला थोडासा आधार आलेला आहे. रस्ते विभागाने या तुटलेल्या लोखंडी कठड्याची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक आणि परिसरातील ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

Web Title: Venna river bridge invites accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.