माणदेशातील मेंढपाळांची वणवण; मुक्काम पोस्ट ‘आज हे गाव, उद्या ते गाव’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:19 AM2019-05-07T06:19:04+5:302019-05-07T06:19:20+5:30

दुष्काळ हा माणदेशाच्या पाचवीला पूजलेला आहे. माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत.

 Verification of shepherds in migration; Stay post 'today hey village, tomorrow to village' | माणदेशातील मेंढपाळांची वणवण; मुक्काम पोस्ट ‘आज हे गाव, उद्या ते गाव’

माणदेशातील मेंढपाळांची वणवण; मुक्काम पोस्ट ‘आज हे गाव, उद्या ते गाव’

googlenewsNext

- नितीन काळेल
सातारा : दुष्काळ हा माणदेशाच्या पाचवीला पूजलेला आहे. माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत. बनगरवाडीतील मेंढपाळांची तर आठ कुटुंबे दिवाळीपासून घोड्यावर संसार बांधून मराठवाड्यात आहेत. मेंढ्या जगविण्यासाठी रोज त्यांना नवे गाव शोधावे लागत आहे.
माण तालुक्यात बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेती आहे. त्याचबरोबर या शेतीवर अवलंबून असणारा दुग्ध, शेळी-मेंढीपालन व्यवसाय. आजही या तालुक्यातील अनेक गावांत मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. या व्यवसायावरच त्यांचा वर्षानुवर्षे उदरनिर्वाह चालतो. दरवर्षी जून महिन्यानंतर पाऊस झाला की सगळीकडे आबादी आबाद असते; पण एखाद्या वर्षी पावसाने डोळे वटारले की जनावरे जगविण्यासाठी घरदार सोडायची वेळ येते. या वर्षीच्या दुष्काळात माण तालुक्यातील अनेक शेतकरी, मेंढपाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या जगविण्यासाठी तालुकाच नव्हे तर जिल्हा सोडून गेले आहेत.
माणमधील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) हे गाव. जेमतेम दोन हजार लोकसंख्या गावाची. या गावातील तरुणवर्ग पुण्या-मुंबईला नोकरीला. तर अनेकांचा मेंढीपालनाचा व्यवसाय. याच गावातील आठ कुटुंबे दुष्काळ पडल्याने गेल्यावर्षी दिवाळी झाल्यानंतर मेंढ्या जगविण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडली आहेत. पंढरपूर, बार्शी अशी गावे करत आज ही कुटुंबे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात आहेत. या बनगरवाडीतील अशोक बनगर, किसन बनगर, सदाशिव वाघमोडे, चंद्रकांत ढेरे, धर्मा दोलताडे, नेताजी बनगर, गणेश शिंगाडे आणि दत्तू काळे हे मेंढ्या जगविण्यासाठी बाहेर पडलेत. तसेच यांच्या घरातील माणसे मिळून १५ जण ५०० मेंढ्यासाठी झटत आहेत. चाºयाच्या शोधात सर्वांनाच दररोज नव्या गावात मुक्काम करावा लागतो. मग, ती जागा घाणीची असो किंवा काट्याकुट्यांची; पण जगायचं आणि जगवायचं हेच ठरवून घरातून बाहेर पडलेल्या या कुटुंबांना आता पाऊस पडेपर्यंत मराठवाड्यातच राहावं लागणार आहे.

मोबाइल चार्जिंग करायला एक जण

मेंढपाळ कुटुंबीय मराठवाड्यात असली तरी गावी मुलं, आई-वडील, नातेवाईक आहेत. त्यांच्याशी दोन-चार दिवसांतून संपर्क करावा लागतो. त्यासाठी काही जणांकडे मोबाइल आहे. हा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी शेजारील गावात जावे लागते. सर्वांचेच मोबाइल एकाने न्यायचे व ते चार्ज करून आणायचे. तोपर्यंत इतरांना मेंढ्यांना पाणी पाजणे, वाघर लावणे, दळण, जळण गोळा करणे अशी कामे करावी लागतात. या कुटुंबाबरोबर ५०० मेंढ्या, ८ घोडी आणि ६ कुत्री आहेत. घोड्यावर कुटुंबाचा सारा संसार असतो.

पाण्याचा भाग आणि जुंधळ्याची रानं म्हणून काळ्या रानात जातो. बार्शी, उस्मानाबाद, लातूरपतूर आम्ही जातू. बाभळीची झाडं असत्याती. त्याच्या शेंगा खाऊन जनावर (जित्राब) जगतं. या रानात मेंढरं जगावायची म्हणून लोकांच्या शिव्याबी खाव्या लागत्यात; पण जगायचं म्हणल्यावर राग धरून थोडाच चालतूया. आता पाऊस पडल्यावर गावाकडं. तवर काळ रानच आमचं घर.
- अशोक बनगर, मेंढपाळ
 

Web Title:  Verification of shepherds in migration; Stay post 'today hey village, tomorrow to village'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.