मेलबर्नच्या निसर्गात स्फुरतेय मराठी कविता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:11 AM2021-02-21T05:11:16+5:302021-02-21T05:11:16+5:30
‘माय मराठी’ सातासमुद्रापार पोहोचली असल्याचं प्रत्येकजण सांगतो. पण साताऱ्यातील कन्या ऑस्ट्रेलियात मराठीचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मेलबर्नच्या निसर्गरम्य ...
‘माय मराठी’ सातासमुद्रापार पोहोचली असल्याचं प्रत्येकजण सांगतो. पण साताऱ्यातील कन्या ऑस्ट्रेलियात मराठीचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मेलबर्नच्या निसर्गरम्य परिसरात ती मराठीतून कविता करीत असून ती स्वत: गातेही. ती स्वरचित कविता तिच्या ‘तेजडायरीज’ यू-ट्यूब चॅनेलवर टाकत असते. त्याला असंख्य व्यूवर्स मिळत आहेत.
मूळचे कोरेगाव येथील असलेले राज्य परिवहन महामंडळातील महाव्यवस्थापक प्रतापसिंह सावंत यांची कन्या तेजस्विनी हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढे वडिलांची बदली झाल्याने तिने ठाण्यातून शिक्षण घेतले अन् आर्किटेक्टचे शिक्षण पुण्यातून घेतले. शालेय वयापासून तेजस्विनी यांना कवितेचा छंद होता. तो त्यांनी अजूनही जपला आहे.
तेजस्विनी सावंत यांचे २०१७ मध्ये लग्न झाले अन् पतीसोबत त्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्नला गेल्या. त्याठिकाणी त्या सध्या प्रोपर्टी म्हणून काम करीत आहेत. काम करीत असताना कविता करण्याचा छंद त्या जोपासत आहेत. त्यातील अनेक कवितांना चाली दिल्या आहेत. या कविता त्या त्यांच्या ‘तेज डायरीज’ या यू-ट्यूज चॅनेलवर अपलोड करीत असतात. ऑस्ट्रेलियात असंख्य सातारकर नोकरीनिमित्ताने गेले आहेत. तेथील सातारकरांसोबतच भारतातूनही हजारो चाहते भेट देत असतात.
चौकट :
‘गुंतले शब्द... निशब्द भावना...
तेजस्विनी सावंत-डक यांनी गुंतले शब्द... निशब्द भावना ही या कवितेवर चित्रीकरण केले आहे. यासाठी सुंदर निसर्ग निवडला आहे. विशेष म्हणजे हे गाणे तेजस्विनी यांनी स्वत: गायिले असून त्यात त्या स्वत: दिसत आहेत.
- जगदीश कोष्टी, सातारा.