उपाध्यक्षांनी महिला कर्मचाऱ्याला खडसावले! सातारा पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:48 AM2018-12-08T00:48:28+5:302018-12-08T00:52:10+5:30

सातारा : नगराध्यक्षांना अंधारात ठेवून स्थायी समितीच्या अजेंड्यावर आपले विषय परस्पर घुसवण्याचा धक्कादायक प्रकार पालिकेत घडला. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के ...

Vice President rocks women's staff! Satara Municipality; | उपाध्यक्षांनी महिला कर्मचाऱ्याला खडसावले! सातारा पालिका

उपाध्यक्षांनी महिला कर्मचाऱ्याला खडसावले! सातारा पालिका

Next
ठळक मुद्देस्थायीच्या अजेंड्यावरून धुसफूससाविआकडून मात्र न घडल्याचा खुलासा

सातारा : नगराध्यक्षांना अंधारात ठेवून स्थायी समितीच्या अजेंड्यावर आपले विषय परस्पर घुसवण्याचा धक्कादायक प्रकार पालिकेत घडला. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी हट्टाने स्थायी समितीचा प्रस्तावित अजेंडा व टिपण्यांचे कागदच उचलून नेल्याने प्रशासन हतबल झाल्याची माहिती पालिका सूत्रांकडून मिळाली. उपाध्यक्षांनी याप्रकरणी कंत्राटी तत्त्वावर काम करणाºया महिला कर्मचाºयाला दमदाटी केल्याची चर्चा असून, सातारा विकास आघाडीने मात्र असे काही घडलेच नसल्याचा खुलासा केला आहे.

कर्मचाºयांनी कारवाईच्या भीतीपोटी चुप्पी साधली; मात्र महिला कर्मचारी दोन तास रडत बसल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणाच्या निमित्ताने सातारा विकास आघाडीमधील दुहीचे आणि दहशतीचे राजकारण समोर आले आहे. प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर उपाध्यक्षांनी नंतर नरमाईच्या सुरात कर्मचाºयांची समजूत काढत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीचा अजेंडा निश्चित करून सभा जाहीर करण्याच्या प्रशासकीय हालचाली सध्या पालिकेत सुरू आहेत. वर्षा अखेरची गडबड आणि विषय समित्यांच्या सभापतिपदांची संपत आलेली मुदत यासाठी ‘स्टँडिंग’ला आपलेच जास्तीत जास्त विषय कसे येतील, यासाठी सातारा विकास आघाडीतल्या काही ज्येष्ठांचा प्रयत्न सुरू आहे. विशेषत: वार्षिक दर मंजुरीच्या काही विषयांसाठी उपनगराध्यक्ष राजेशिर्के बुधवारी अचानक आक्रमक झाले, सभासचिवांना सहकार्य करणाºया कर्मचाºयांना चढ्या आवाजात ऐकवलं. उपनगराध्यक्षांनी प्रस्तावित अजेंड्याची कागदेच आपल्या दालनात उचलून नेली आणि त्यांचे विषय अंतिम होईपर्यंत कोणीही केबिनमध्ये यायचे नाही, असे फर्मानच त्यांनी सोडले.

या प्रकाराने प्रशासन हतबल झाले. संबंधित कर्मचाºयांनी कानावर हात ठेवले. मात्र उपनगराध्यक्षांच्या रुद्र्रावतारामुळे एका महिला कर्मचाºयाने भीतीपोटी काम सोडून दोन तास टिपे गाळली. हा प्रकार दुपारी सुमारे तासभर सुरू होता. मनासारख्या सर्व विषयांची तजवीज केल्यानंतर सूर नरमलेल्या उपनगराध्यक्षांनी त्या महिला कर्मचाºयाची समजूत घातली. मात्र, साविआच्या दबाव तंत्रापुढे प्रशासन सुद्धा अवाक् झाले.

पडद्याआडून राजकीय सुरूंग...
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या स्वाक्षरीने स्थायी समितीचा अजेंडा अंतिम होत असतो. मात्र अजेंडा अंतिम होताना साविआचे सर्व सभापती व सदस्य समन्वयाने चर्चा करण्याचा संकेत आहे. साविआतील गटबाजीला ऊत आल्याने काही नगरसेवकांचा नगराध्यक्षांवर अघोषित बहिष्कार आहे. अजेंडा उपनगराध्यक्षांकडे चर्चा करून ठरवायचा आणि सहीसाठी तो नगराध्यक्षांकडे पाठवण्याची नवी पद्धत काहीजणांनी शोधून काढली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. त्यांना अजिबातच सहकार्य होत नसल्याची खदखद पालिकेतीलच कर्मचारी व्यक्त करू लागले आहेत. नगराध्यक्ष हे पद घटनात्मक आहे. त्यांच्या अधिकाºयाला पडद्याआडून राजकीय सुरुंग लावणाºयांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचा आहे.
 

असा कोणताही प्रकार घडलेलाच नाही. कामाच्या पातळीवर चर्चा करण्याची वेळ आली तर मी जबाबदार व्यक्तीशी बोलेन. कंत्राट पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाºयांशी मी बोलण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. कोणीतरी खोडसाळपणे हे वृत्त पसरवले. या घटनेशी माझा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.
- सुहास राजेशिर्के,
उपनगराध्यक्ष, सातारा

Web Title: Vice President rocks women's staff! Satara Municipality;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.