साताऱ्यातील खड्ड्याने घेतला पुण्यातील महिलेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:39 PM2020-03-06T13:39:27+5:302020-03-06T14:01:55+5:30
शिवथर ते वडूथदरम्यान असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळ्याने दुचाकीवरून पडून पुण्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. जयश्री सतीश रासकर (४२, रा. धालेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
सातारा : शिवथर ते वडूथदरम्यान असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळ्याने दुचाकीवरून पडून पुण्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. जयश्री सतीश रासकर (४२, रा. धालेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धालेवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील सतीश हरीभाऊ रासकर व त्यांच्या पत्नी जयश्री हे दोघे बुधवारी सकाळी धालेवाडीहून पाटणला मोटरसायकलवरून निघाले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवथर ते वडूथदरम्यान असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची मोटारसायकल जोरदार आदळली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या जयश्री रासकर या खाली पडून गंभीर जखमी झाल्या.
त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचे पती सतीश रासकर यांनी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.