बळीराजाचा घाम कचºयात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 05:39 PM2017-08-05T17:39:00+5:302017-08-05T17:39:04+5:30
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचरकुंडीत मोठ्या प्रमाणात घेवडा, मेथी कांदा, बटाटा यांची पोती सडलेल्या अवस्थेत पडत आहे. पावसामुळे भाजीपाला कुजत आहे. बाजारात मागणी असून देखील काही भाजी विक्रत्यांच्या मनमानी दरामुळे शेतकºयांचा माल विकला जात नाही. होलसेल आणि किरकोळ विक्रीत मोठी तफावत असल्याने भाजी विक्रत्यांचे दरफलक निश्चित करावे अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचरकुंडीत मोठ्या प्रमाणात घेवडा, मेथी कांदा, बटाटा यांची पोती सडलेल्या अवस्थेत पडत आहे. पावसामुळे भाजीपाला कुजत आहे. बाजारात मागणी असून देखील काही भाजी विक्रत्यांच्या मनमानी दरामुळे शेतकºयांचा माल विकला जात नाही. होलसेल आणि किरकोळ विक्रीत मोठी तफावत असल्याने भाजी विक्रत्यांचे दरफलक निश्चित करावे अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. शेतकरी भाजीपाला घाउक व्यापाºयांना देतात. श्रावण महिन्यामुळे भाजी पाल्याला मोठी मागणी असल्याने भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे दर वाढवीली आहे. ही वाढ आणि होलसेल विक्रीतील दरात बराच फरक आहे. काही भाजीपाल्यांचे दर अवाक्याबाहेर असल्याने ग्राहकही भाज्या काटकसरीने घेत आहे. त्यामुळे आवक असून देखील विक्रेत्यांनी वाढविलेल्या दराचा फटका शेतकºयांना बसत आहे. |