डर के आगे जीत है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:57+5:302021-04-11T04:37:57+5:30

​मात्र, प्रत्यक्षात आपल्याला समाजात या ताणाचे स्पष्ट आणि उघड दर्शन होत नाही. कारण, जो-तो या ताणाला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात ...

Victory over fear! | डर के आगे जीत है!

डर के आगे जीत है!

Next

​मात्र, प्रत्यक्षात आपल्याला समाजात या ताणाचे स्पष्ट आणि उघड दर्शन होत नाही. कारण, जो-तो या ताणाला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात गुंतलेला आहे. हा ताण आपल्या स्वतःच्या जगण्यात उमटू नये म्हणून प्रत्येकजण ‘कूल’ राहण्याचा, बेडर व बेफिकीर बनण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र, ताण निर्माण होण्याची खरीखुरी कारणे शिल्लक असताना ताण असा झटकून नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे, आपल्याकडे दोनच पर्याय राहतात. पहिला पर्याय आहे, डोळे उघडे ठेऊन ताणाकडे पाहणे आणि त्याला कारणीभूत असणारे घटक दूर करण्याचा प्रयत्न करणे. तर दुसरा पर्याय आहे की, स्वतःचे डोळे झाकून ‘ताण नाहीच आहे’ अशी सुखद, सोयीस्कर समजूत करून घेणे. बहुतांश लोक या दुसऱ्या मार्गालाच कळत-नकळत पसंती देत आहेत. वैयक्तिक आणि सामाजिक जीवन पूर्वीसारखेच विना-अडसर सुरू रहावे यासाठी आग्रही आहेत. मास्क, डिस्टन्सिंग, गर्दीवरचे निर्बंध यांचा तिरस्कार करीत आहेत. कारण, या दुसऱ्या मार्गावर ‘करोनाचे संकट कृत्रिम किंवा खोटे असल्याचा’ अफूच्या नशेप्रमाणे तात्पुरता का होईना पण दिलासा आहे! याउलट, पहिल्या मार्गात ताण जादूसारखा नष्ट होत नाही. तर, आधी ताण स्वीकारून नंतर त्याचे प्रयत्नपूर्वक निराकरण करावे लागते. हा मार्ग खडतर आहे. तणावपूर्णही आहे. पण, अंतिमतः ताणाचे सुयोग्य नियमन करणारा आहे.

​ताणाची भावना ही आपल्या शरीर आणि मनाला संभाव्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज करीत असते. त्यामुळे, ज्याप्रमाणे व्हॅक्सीननंतर येणाऱ्या तापाला घाबरण्याचे कारण नाही; तसेच खऱ्या संकटांच्या काळात ‘ताणाचाच ताण’ घेण्याची आवश्यकता नाही! अस्वस्थ वाटणे, एकटे वाटणे, आनंदी न वाटणे, भयभीत वाटणे, चिडचिड होणे, थकवा, डोकेदुखी, निद्रानाश यांसारखी ताणाची लक्षणे थोड्या प्रमाणात वाटली तर आपण लगेच आजारी ठरत नाही. आणि ही लक्षणे जास्त असतील तरी ते आजारपण असते; तो कमीपणा असत नाही! म्हणून, स्वतःच्या मन आणि शरीराने ताणाच्या भाषेत दिलेले हे संदेश नीट काळजीपूर्वक ऐका. स्वतःच्या लढाऊ क्षमतांवरचा विश्वास दृढ करा आणि अक्कलहुशारीने नव्या बदलांचा स्वीकार करा! आवश्यकता पडेल तेव्हा न लाजता योग्य ती मदत घ्या. ताण लपवू नका, तर नीट हाताळा. आपल्या मनुष्यपणाचीच तर ती निशाणी आहे! डर के आगे जीत है।

​​​​​​.... डॅा. अनिमिष चव्हाण,

एम. डी. (मनोविकारतज्ज्ञ)

Web Title: Victory over fear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.